‘आधी सुविधा द्या, मग दंड आकारा’, मनसेचे ठामपाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 06:06 AM2017-12-10T06:06:52+5:302017-12-10T06:07:00+5:30
शहरात क्लीनअप मार्शल उपक्रम राबवण्याआधी रस्त्यांवर कच-याचे डबे ठेवण्यात यावे. तसेच, क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून ठाणेकरांकडून दंड वसूल करण्याआधी त्यांना सक्षम पायाभूत सुविधा पुरवा,
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरात क्लीनअप मार्शल उपक्रम राबवण्याआधी रस्त्यांवर कच-याचे डबे ठेवण्यात यावे. तसेच, क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून ठाणेकरांकडून दंड वसूल करण्याआधी त्यांना सक्षम पायाभूत सुविधा पुरवा, अशा मागणीचे निवेदन मनसेने शुक्रवारी महापालिकेला दिले. तसेच, पालिकेने या कुंड्या न बसवल्यास मनसे स्वखर्चाने शहरात कचराकुंड्या बसवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहर अस्वच्छ करणाºयांवर अंकुश बसावा, यासाठी शहरभर ठामपाच्या वतीने तैनात करणाºया क्लीनअप मार्शलला मनसेने विरोध केला आहे. कचºयाची विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने नागरिकांना साध्या मूलभूत सुविधादेखील दिल्या नाहीत. अनेक सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या नाही. त्यामुळे ठाणेकरांकडून दंड वसूल करणे, ही महापालिकेची भूमिका योग्य नाही. आधी पायाभूत सुविधा द्या, अशी मागणी पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना दिले. या वेळी मनविसेचे ठाणे शहराध्यक्ष संदीप पाचंगे, ठाणे शहर उपाध्यक्ष रवींद्र मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सुरु वातीला केवळ प्रबोधन करणार
२२५ पैकी ३० क्लीनअप मार्शल शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी दाखल झाले असून सुरु वातीला केवळ ठाणेकरांचे प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटल्यानंतर नागरिक स्वत: सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार नाहीत. त्यानंतर, जर कोणी शहर अस्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर त्यानंतर दंड आकारण्यात येणार असल्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे.