झोपडपट्टी, लोकवस्तीच्या परिसरात मोफत होमिओपॅथीक, आयुर्वेदिक औषधे पुरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 04:25 PM2020-05-07T16:25:31+5:302020-05-07T16:27:00+5:30

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव डोळ्यासमोर ठेवून आता आयुक्त विजय सिंघल यांनी झोपडपटटी भागात तसेच दाट लोकवस्तीच्या भागात होमियोपॅथीच्या गोळ्या व आर्युवेदीक औषधे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरवात आजपासून करण्यात आली.

Provide free homeopathic, ayurvedic medicines in slums, populated areas | झोपडपट्टी, लोकवस्तीच्या परिसरात मोफत होमिओपॅथीक, आयुर्वेदिक औषधे पुरविणार

झोपडपट्टी, लोकवस्तीच्या परिसरात मोफत होमिओपॅथीक, आयुर्वेदिक औषधे पुरविणार

Next

ठाणे : झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या परिसरामध्ये कोरानाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी गुरुवारपासून आयुष मंत्रालयाने शिफारस केलेली आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक औषधे वितरित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला. दरम्यान धोकादायक इमारतींना दुरस्ती देताना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची पूर्ण खातरजमा करूनच देण्यात याव्यात अशा सूचनाही सिंघल यांनी सर्व प्रभागस्तरिय अधिकाऱ्यांना दिल्या.
                          प्रतिबंधित क्षेत्रात जेवढी कडक अंमलबजावणी करता येईल तितकी कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. सर्व अधिकारी चांगले काम करीत आहेत असे अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी परिमंडळ उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसींग करताना अतिशय काळजीपूर्वक करावे, प्रत्येक कोरोना बाधित रूग्णांचे अति जोखीम गटातील व्यक्ती तसेच कमी जोखीम गटातील व्यक्तींची तात्काळ वर्गवारी करावी, बाधित रूग्णांना तातडीने स्थलांतरित करावे जेणेकरून त्याच्यामुळे इतरांना कोरोनाचा संसर्ग होवू नये, कंटेनमेंट झोनच्या बाहेर कोरानाचा संसर्ग वाढू नये, कोरोना बाधितांची संख्या कुठे वाढत आहे, कशामुळे वाढते आहे याचा व्यविस्थत अभ्यास करावा अशा अनेक महत्वाच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान आयुष मंत्रालयाने सुचिवलेल्या होमिओपॅथी व आयुर्वेदिक गोळ्या उद्यापासून दाट लोकवस्ती व झोपडपट्टी असलेल्या परिसरात वितरित करण्यात येणार आहेत. यामध्ये वागळे प्रभाग समितीमधील सी. पी. तलाव, किसननगर, पाईपलाईन, लोकमान्यनगर आणि मुंब्रा या ठिकाणी सुरूवातीस वितरित करण्यात येणार आहेत. झोपडपट्टी, दाट लोकवस्तीच्या परिसरात मोफत होमिओपॅथीक, आयुर्वेदिक औषधे पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 

 

Web Title: Provide free homeopathic, ayurvedic medicines in slums, populated areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.