केडीएमटीमधून दिव्यांगांना मोफत प्रवासाची सुविधा मिळवून देणार, दिव्यांग सहायता शिबिरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 05:52 PM2017-10-14T17:52:59+5:302017-10-14T17:53:18+5:30

केडीएमटीमधूनही दिव्यांगांना विनामूल्य प्रवासाची सुविधा मिळवून देण्यासाठी महापौर तसेच आयुक्तांकडे पाठपुरावा कारण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे दिली.

To provide free travel facility to the goddesses from KDMT, MP Dr Divya Help Camp Srikant Shinde's Guilty | केडीएमटीमधून दिव्यांगांना मोफत प्रवासाची सुविधा मिळवून देणार, दिव्यांग सहायता शिबिरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही

केडीएमटीमधून दिव्यांगांना मोफत प्रवासाची सुविधा मिळवून देणार, दिव्यांग सहायता शिबिरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही

Next

डोंबिवली - बेस्ट आणि टीएमटीच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या केडीएमटीमधूनही दिव्यांगांना विनामूल्य प्रवासाची सुविधा मिळवून देण्यासाठी महापौर तसेच आयुक्तांकडे पाठपुरावा कारण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे दिली. खा. डॉ. शिंदे यांनी आयोजित केलेल्या दिव्यांग सहायता शिबिराच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी ११०० दिव्यांगानी शिबिराचा लाभ घेतला असून दोन दिवसांत अंदाजे सव्वा दोन हजार लाभार्थ्यांची तपासणी झाली आहे.

समाजात वावरताना दिव्यांगांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जीवनावश्यक साधने घेणे देखील पैशांअभावी अनेकांना परवडत नाहीत, यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे खा. डॉ. शिंदे म्हणाले. खा. डॉ. शिंदे यांनी दिव्यांगांच्या या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करत कल्याण लोकसभा क्षेत्रात आयोजित केलेल्या या शिबिरांबद्दल दिव्यांग व्यक्तींनी समाधान व्यक्त केले.

या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव व अत्यावश्यक साधने वाटपासाठी नाव नोंदणी व मोजमाप प्रक्रिया होणार असून साधारण महिन्याभराने पुन्हा शिबिराचे आयोजन करून त्यात साधनांचे वाटप केले जाणार आहे. खा. डॉ. शिंदे यांच्या खासदार निधीतून अंबरनाथ येथील प्रवीण जोशी, डोंबिवली येथील दत्तात्रय सांगळे आणि उल्हासनगर येथील मंगल उल्बी या दिव्यांगांना तीन चाकी स्कूटर खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते देण्यात आली; तसेच, कळवा येथील शरद पवार आणि दिवा येथील संतोष वानखेडे यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला. खासदार निधीचा अशा प्रकारे वापर केल्याबद्दल उपस्थितांनी खा. डॉ. शिंदे यांचे कौतुक केले.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, नगरसेवक दीपेश म्हात्रे,केडीएमटी सभापती संजय पावशे,  महिला आघाडी जिल्हा संघटक विजया पोटे, तसेच, नगरसेवक महेश गायकवाड, सुशिला माळी, शीतल मंढारी, माधुरी काळे, उपशहरप्रमुख शहर पाटील, संजिता गायकवाड, शहर संघटक कविता गावंड, उपशहरप्रमुख संतोष चव्हाण, किशोर मानकामे आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या केंद्रीय सामाजिक न्याय खात्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या मदतीने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून केंद्र शासनाच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अॅलिम्को) या कृत्रिम अवयव बनवणाऱ्या कंपनीचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्याचप्रमाणे धर्मवीर दिव्यांग सेनेचे शरद पवार, अपंग सुश्रुषा सेवा संघाचे अरुण जाधव, हमराही एज्युकेशन ट्रस्टच्या नूरिया खान, अपंग सेवा संघाचे भरत खरे, अपंग साधना संघ, अपंगालय आणि जिल्हा रुग्णालयाचेही मोलाचे सहकार्य या शिबिरांना लाभले आहे.
उद्या (रविवारी) खिडकाळेश्वर मंदिर, खिडकाळी व झमझम हॉल, खडी मशीन रोड, कौसा-मुंब्रा या ठिकाणी ही शिबिरे होणार असून आज वेळेअभावी येऊ न शकलेल्या दिव्यांग व्यक्ती देखील या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेऊ शकतील, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.

दिव्यांगांनी व्यक्त केले समाधान, नातेवाईकांनी दिले धन्यवाद 
‘क्षितीज’ या विशेष मुलांच्या शाळेतील ३८ विद्यार्थी आणि ‘संवाद’ या कर्णबधिर मुलांच्या शाळेतील ७ विद्यार्थ्यांनी देखील या शिबिराचा लाभ घेतला. या विद्यार्थ्यांना विशेष मुलांसाठी मेंदूचा विकास करणारे विशेष गेम्स आणि व्यायामासाठीचे साहित्य यांचा समावेश असणारे एमआर आणि सेंसरी किट देण्यात आले.

Web Title: To provide free travel facility to the goddesses from KDMT, MP Dr Divya Help Camp Srikant Shinde's Guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.