उल्हासनगर तहसिलदार कार्यालयाकडून ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती

By सदानंद नाईक | Published: February 24, 2024 11:42 AM2024-02-24T11:42:24+5:302024-02-24T11:42:39+5:30

उल्हासनगर तहसीलदार कार्यालयाच्या वतीनेही ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिके नागरिकांना दाखविण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार कल्याणी कदम यांनी दिली

Public awareness about EVM machine and VVPAT from Ulhasnagar Tehsildar office | उल्हासनगर तहसिलदार कार्यालयाकडून ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती

उल्हासनगर तहसिलदार कार्यालयाकडून ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती

उल्हासनगर : ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट बाबत नागरिकांना माहिती होण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडून मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. ही मोहीम २९ फेब्रुवारी पर्यंत ही जनजागृती राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार कल्याणी कदम यांनी दिली. 

ठाणे जिल्ह्यात एकून १८ विधानसभा मतदारसंघ असून मतदारसंघात ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट बाबत नागरिकांना माहिती होण्यासाठी तब्बल ३६ मोबाईल व्हॅनद्वारे माहिती देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट बाबत मतदार व नागरिकांत जनजागृती करण्यात येत आहे. उल्हासनगर तहसीलदार कार्यालयाच्या वतीनेही ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिके नागरिकांना दाखविण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार कल्याणी कदम यांनी दिली. तसेच ही मोहीम २९ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रशांत कुमावत  यांनी दिली आहे.

Web Title: Public awareness about EVM machine and VVPAT from Ulhasnagar Tehsildar office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.