जागतिक जल दिनानिमित्त भिवंडीत जनजागृती
By नितीन पंडित | Published: March 22, 2024 08:08 PM2024-03-22T20:08:00+5:302024-03-22T20:08:38+5:30
विविध पोस्टर्स प्रदर्शनातून जनजागृती करून पाणी वाचविण्याच्या कृती आणि योजनांची माहिती देण्यात आली.
भिवंडी: जागतिक जल दिवसाचे औचित्य साधत शहरातील बी एन एन महाविद्यालयात केम स्टार सायन्स क्लब यांच्या वतीने समाजात जनजागृती होण्यासाठी नळ तोटी गळती रोखण्यासाठी सतत सतर्क राहण्याच्या उद्देशाने हॅंड्स-ऑन ट्रेनिंग फॉर फिक्स टॅप लीकेज या विशेष कार्यक्रमातून पाणी वाचविण्यासाठी विद्यार्थ्याना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विविध पोस्टर्स प्रदर्शनातून जनजागृती करून पाणी वाचविण्याच्या कृती आणि योजनांची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात प्राध्यापकांच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थ्यांना नळ तोटी गळती दुरुस्ती करण्याच्या प्रयोगात्मक प्रशिक्षणाचा संच दिला.कार्यक्रमाच्या निमित्त हरित शपथ देण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भिवंडी महानगरपालिका पर्यावरण प्रमुख आकाश आव्हाड,सौदी अरेबिया येथील मॉडर्न बिल्डिंग इंडस्ट्रीजचे असिस्टंट प्लंबर बिलाल खान उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रीन क्लबचे संयोजक डॉ पुंडलिक वारे यांनी केले. कार्यक्रमास डॉ सुधीर निकम,डॉ सुरेश भादर्गे,डॉ दिलीप काकवीपुरे,डॉ राजू रुपवते,डॉ.कुलदीप राठोड,प्रा.करून खोब्रागडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.