तरूणाईसाठी मुंब्य्रात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:56 AM2019-01-26T00:56:58+5:302019-01-26T00:57:02+5:30

सोशल नेटवर्कवरील प्रक्षोभक संदेश वाचून तरुणांनी वाममार्गाला लागू नये, यासाठी मुंब्य्रातील अलमास कॉलनी, कादर पॅलेस, शिमला पार्क, रशिद कपाऊंड, कौसा आदी भागांत येथील काही सामाजिक संस्थांनी गुरुवारपासून जनजागृती अभियान सुरू केले.

Public awareness in Mumbra for youth | तरूणाईसाठी मुंब्य्रात जनजागृती

तरूणाईसाठी मुंब्य्रात जनजागृती

Next

- कुमार बडदे

मुंब्रा : सोशल नेटवर्कवरील प्रक्षोभक संदेश वाचून तरुणांनी वाममार्गाला लागू नये, यासाठी मुंब्य्रातील अलमास कॉलनी, कादर पॅलेस, शिमला पार्क, रशिद कपाऊंड, कौसा आदी भागांत येथील काही सामाजिक संस्थांनी गुरुवारपासून जनजागृती अभियान सुरू केले. कथित देशविघातक कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या मुंब्य्रातील तीन भावांसह एकूण चौघांना दहशतवाद विरोधी पथकाने नुकतीच अटक केली.
हे चौघे सोशल नेटवर्कच्या माध्यमातून संपर्कात आले होते, हे तपासात उघडकीस आल्याने मुले वाममार्गाला लागू शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे पालकांनी मुलांच्या मोबाईलवर लक्ष ठेवावे, मोबाईलमध्ये तो काय बघतो, तो कोणाच्या संपर्कात आहे, याकडे पालकांनी लक्ष ठेवावे, यासाठी हे अभियान असून, लवकरच ते मशिदीमधूनही करण्यात येणार आहे. गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना याची कल्पना देण्यात यावी, यासाठी शाळा महाविद्यालयांना विनंतीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती अभियान राबवत असलेल्या अल अहद चॅरीट्रबल ट्रस्टचे सरचिटणीस आरीफ इराकी तसेच मिल्ली तारीखचे फैसल चौधरी आणि अलमास वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणसि वसीम सय्यद यांनी लोकमतला दिली.

Web Title: Public awareness in Mumbra for youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.