युवादिनी जिल्हाभर जनजागृती

By admin | Published: August 12, 2016 02:12 AM2016-08-12T02:12:14+5:302016-08-12T02:12:14+5:30

जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्ती व गरोदर माता यांच्या केलेल्या एचआयव्ही (एड्स) तपासणीत मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील १९ ते २९ या वयोगटांतील २१ ते २४ टक्के युवकांना

Public awareness of Youth Day district | युवादिनी जिल्हाभर जनजागृती

युवादिनी जिल्हाभर जनजागृती

Next

पंकज रोडेकर ल्ल ठाणे
जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्ती व गरोदर माता यांच्या केलेल्या एचआयव्ही (एड्स) तपासणीत मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील १९ ते २९ या वयोगटांतील २१ ते २४ टक्के युवकांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक बाब आंतरराष्ट्रीय युवादिनी समोर आली. ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये ‘एड्सविषयी’ जनजागृती मोहीम राबवली जात आहे. तसेच यंदाचे ‘युवकांचा दीर्घकालीन विकासासाठी पुढाकार’असे या दिनाचे घोषवाक्य आहे.
आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारे ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या संस्थेमार्फत एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रा (आयसीटीसी) मार्फत सर्वसामान्य व्यक्ती आणि गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी केली जाते. त्यानुसार, मागील दोन वर्षांत एचआयव्हीसंबंधित केलेल्या एकूण तपासणीत १९ ते २९ वयोगटांतील २१ ते २४ टक्के युवकांना त्याची लागण झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. एकूण तपासणीत निदर्शनास येणारी एचआयव्हीबाधित युवकांची संख्या लक्षात घेऊन युवकयुवतींना जागरूक करणे, हीच काळाची गरज बनली आहे. तसेच वाढते प्रमाण कमी करणे, हे एक आव्हान असून त्याला वेळीच आळा घालण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एड्सविषयी जिल्हा प्रशासनामार्फत जनजागृती मोहीम राबवली जाते. त्या मोहिमेंतर्गत प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक व पाठपुराव्यामार्फत उपक्रम राबवून आजच्या युवा पिढीला या आजारापासून लांब ठेवण्यासाठी याविषयी विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत.
शुक्रवारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक केम्पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांत एड्सविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
तसेच एनकेडी महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धा घेण्यात येत आहे. एड्सविषयी महाविद्यालय स्तरावर रेड रिबन क्लबची स्थापना केली आहे.

Web Title: Public awareness of Youth Day district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.