मराठा आरक्षणासाठी जनसुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:41 AM2018-05-01T01:41:09+5:302018-05-01T01:41:09+5:30
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम.जी. गायकवाड यांच्यासह सदस्य ८ मे रोजी ठाणे येथे मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी घेणार आहेत
ठाणे : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम.जी. गायकवाड यांच्यासह सदस्य ८ मे रोजी ठाणे येथे मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी घेणार आहेत. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा व नवी मुंबई पालिका क्षेत्रासाठी कोकण भवन येथे १६ मे रोजी जाहीर जनसुनावणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जनसुनावणीच्या या नियोजनानुसार आयोगाच्या अध्यक्षांसमवेत सदस्य सुवर्णा रावळ, सुधीर ठाकरे आदींसह अधिकारी उपस्थित राहणार आहे.
प्रथम ठाणे येथील शासकीय विश्रामगृह येथे होणाऱ्या या जनसुनावणीत ठाणे व पालघर जिल्ह्यांतील व्यक्ती, संस्था यांनी मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण इत्यादीविषयी काही म्हणणे किंवा सूचना मांडावयाच्या असल्यास दुपारी ११ ते ३ या वेळेत ऐतिहासिक दस्तावेज, पुरावे यासह उपस्थित राहावे, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त उज्ज्वला सकपाळे यांनी केले आहे. कोकण भवन येथेदेखील सर्व संबंधितांनी ११ ते ३ या वेळेत समक्ष उपस्थित राहून आपले म्हणणे आयोगासमोर मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.