धनगरांना एसटीच्या आरक्षणात समाविष्ट करण्याच्या विरोधात आदिवासी समाजाचा ठाण्यात जनआक्रोश मोर्चा
By सुरेश लोखंडे | Published: October 27, 2023 05:35 PM2023-10-27T17:35:52+5:302023-10-27T17:37:40+5:30
माेर्चेकरांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेउन मागण्यांचे निवेदन दिले.
ठाणे: धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या राज्य शासनाच्या हालचाली सुरू असल्याचा आराेप करून त्याविराेधात आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीने शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. या माेर्चात शेकडाे तरूण, युवती व महिला वर्ग माेठ्यासंख्येने सहभागी झाला हाेता. या माेर्चेकरांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेउन मागण्यांचे निवेदन दिले.
महाराष्ट्रातील धंनधांडग्या गैरआदिवासी धनगर जातीला खऱ्या आदिवासीच्या एसटी प्रवर्गात यादीत समाविष्ट करून, आदिवासीच्या सवलती देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे,असा आरोप या माेर्चेकरांनी यावेळी केला. यावेळी विविध घाेषणांसह मागण्यांचे बॅनर घेउन या आदिवासींनी पारंपारीक नृत्य व लेक्षिमच्या तालावर ठाणे जिल्हाधिकारी कार्या लय गाठले. चाेख पाेलीस बंदाेबस्तात काढलेल्या या माेर्चाला पाेलिसांनी शासकीय विश्रामगृहाजवळ आडवले. या वेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेउन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
एसटी प्रवर्गा च्या आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ठ करू नये, आदिवासी म्हणून नाेकरीत असलेल्या गैर आदिवासींवर कारवाई करावी. पद भरतीचा खासगी जीआर तत्काळ रद्द करावा. शाळा दत्तक घेणे त्वरीत बंद करा. जागतिक आदिवासी दिनी सुटी घाेषीत करावी. आदिवासी कार्यकत्यार्ंवरील खाेट्या केसेस मागे घ्याव्यात आदी मागण्या यावेळी या जनआक्रोश मोर्चाव्दारे करण्यात आल्या. या मोर्चाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष यशवंत मलये, सचिव विश्वनाथ किरकिरे, दत्तात्रय भुयाळ, जयराम राऊत, सल्लागार मधुकर तळपाडे,दीपक फुफाणे, श्रावण मोवले, संतोष वड, रमेश वळवी, विजय मातेरा, किशोर म्हात्रे आदींकडून केले जाणार आहे.