जनजागृतीसाठी घेतला लोकसहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 01:08 AM2020-08-02T01:08:08+5:302020-08-02T01:08:26+5:30

तीन एलईडी व्हॅन केल्या उभ्या । बॅनर, रिक्षातून प्रचारावर तीन लाखांचा खर्च

Public participation taken for public awareness | जनजागृतीसाठी घेतला लोकसहभाग

जनजागृतीसाठी घेतला लोकसहभाग

Next

पंकज पाटील ।

अंबरनाथ : कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने जनजागृती केलेल्या खर्चापैकी निम्मा खर्च हा लोकसहभागाच्या माध्यमातून करण्यात आला आहे, तर उर्वरित खर्च महापालिकेच्या निधीतून करण्यात आला आहे

अंबरनाथ नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली. शहरात सुरु वातीच्या काळात मुख्य रस्त्यांवर तीन एलईडी व्हॅन उभ्या करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. ज्या मार्गावरून मुंबईला जाणारे कामगार येजा करीत होते, त्या मार्गावर या एलईडीच्या माध्यमातून जाहिरात करण्यात आली. त्यासाठी पालिकेने रुपयादेखील खर्च केला नाही. तो खर्च लोकसहभागाच्या माध्यमातून करण्यात आला. स्थानिक केबल वाहिनीवर करण्यात आलेल्या जाहिरातींचा खर्चदेखील लोकसहभागातून केला. शहरात बॅनर लावणे, रिक्षा आणि चारचाकी वाहनांच्या माध्यमातून जनजागृती करणे, यासाठी पालिकेने सुमारे तीन लाखांच्या आसपास खर्च केला. जाहिरातींची सर्वात महत्त्वाची जबाबदारी अंबरनाथ नगरपालिकेच्या घंटागाडीनेच पार पाडली. दररोज या घंटागाड्या शहरभर फिरत असल्याने त्याच घंटागाड्यांनी जनजागृतीचे संदेश दिले.
 

Web Title: Public participation taken for public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे