सोसायटीतील सार्वजनिक ठिकाणी काळ्या काचांच्या आड अश्लील चाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:08 AM2019-07-09T00:08:15+5:302019-07-09T00:08:21+5:30
लेखी तक्रार करूनही कारवाई नाही : महिला पोलिसाची फिर्याद
ठाणे : चारचाकी गाड्यांना असलेल्या काळ्या काचांच्या आड उच्चभ्रू सोसायटीच्या आवारात भरदिवसा अश्लील चाळे सुरू असल्याची लेखी तक्रार त्याच सोसायटीत राहणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाºयाने कासारवडवली पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीनंतर अद्यापही कोणतीही कारवाई सोसायटीने किंवा पोलिसांनी केलेली नाही. यावरून सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून काय वागणूक मिळत असेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
तक्रारदार ठाणे शहर पोलीस दलात कर्मचारी असून त्या घोडबंदर रोडवरील कावेसर येथील ग्रीन स्क्वेअर सोसायटीत राहतात. त्या २६ जून २०१९ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोसायटी परिसरात फिरताना सी-१ बिल्डिंगच्या पाठीमागे लावलेल्या गाडीतून स्त्रीपुरुषाचा आवाज येत होता. तो आवाज ऐकून त्यांनी गाडीचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी कोणीही दार उघडले नाही. म्हणून, समोरील काचेतून पाहिल्यावर गाडीत ते दोघे अर्धनग्न अवस्थेत शारीरिक संबंध करताना आढळून आले. त्यानंतर, त्यांनी पाठीमागच्या गेटवरून वॉचमन... वॉचमन असा आवाज दिला. परंतु, वॉचमननेही प्रतिसाद दिला नाही. नंतर अध्यक्षांना व्यंकटेश... व्यंकटेश.... करून आवाज दिला. परंतु, तेही घरी नसल्यामुळे त्यांचे आईवडील पुढे आले. दरम्यान त्याच सोसायटीत राहणाºया गाडीतील त्या तरुणाने बाहेर आल्यावर अश्लील शिव्या देऊन तुझी गाडी समोरून काढ, नाहीतर ती उडवण्याची धमकी दिली. त्यानंतर, त्याने त्याची गाडी सोसायटीतून बाहेर नेली आणि त्या तरुणीला रिक्षात बसून जाण्यास सांगितले.
दरम्यान, खाजगी काम करून परत सोसायटीत आल्यावर त्या तरुणाचे आईवडील, भाऊ आणि त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी लेखी तक्रारीत केला आहे. याप्रकरणी २८ जूनला कासारवडवली पोलीस ठाण्यात आणि सोसायटीला लेखी तक्र ार दिली आहे. तसेच त्या काळ्या क ाचा असलेल्या गाडीसंदर्भात वाघबीळ वाहतूक उपशाखेतही तक्रार करून नंबरही दिले असून अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
असा प्रकार घडल्याचा दुजोरा देऊन सोसायटीद्वारे कारवाई झालेली नाही. तसेच याबाबत लेखी तक्रार आली असून त्याद्वारे पोलिसांकडून कारवाई व्हावी, अशी मागणी सोसायटीची आहे.
- व्यंकटेश शानभान, अध्यक्ष, ग्रीन स्क्वेअर, सोसायटी, ठाणे
याबाबत लेखी तक्रार आली असून अद्यापही कोणतीही कारवाई अथवा गुन्हा दाखल झालेला नाही. चौकशी करून पुढे कारवाई केली जाईल.
- किशोर खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कासारवडवली,
पोलीस ठाणे