भिवंडी लोकसभेत आरपीआय सेक्युलरचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा
By नितीन पंडित | Updated: April 27, 2024 17:17 IST2024-04-27T17:17:20+5:302024-04-27T17:17:57+5:30
शनिवारी आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस एड. किरण चन्ने यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करत महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला.

भिवंडी लोकसभेत आरपीआय सेक्युलरचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा
भिवंडी: भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये आरपीआय सेक्युलर पक्षाने महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना आपला जाहीर पाठिंबा जाहीर केला. शनिवारी आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस एड. किरण चन्ने यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करत महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला.
ऍड.चन्ने हे जिजाऊ संघटनेचे लोकसभेचे अपक्ष इच्छुक उमेदवार निलेश सांबरे यांचे निकटवर्तीय होते.मात्र भाजप सरकारला पाडायचे असल्यास मतांचे विभाजन नको, जिजाऊ संस्थेमुळे महाविकास आघाडीत मतांचे विभाजन होण्याची शक्यता असल्याने भारतीय लोकशाही व संविधान वाचवायचे असेल तर महाविकास आघाडीला सक्षमपणे साथ देणे गरजेचे आहे.यासाठीच आपण महाविकास आघाडी सोबत जात असल्याचे स्पष्टीकरण देखील चन्ने यांनी यावेळी दिले.
भाजप सरकारने भिवंडी महापालिकेचे टोरंट पावरवरील २८५ कोटी रुपये थकबाकी माफ करून शहरातील नागरिकांची दिशाभूल केली आहे.टोरंट पॉवरच्या या मनमानी कारभार विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून महाविकास आघाडीसोबत न्यायालयीन व आंदोलने करून रस्त्यावरची लढाई लढून टोरंट पावरला भिवंडीतून हद्दपार केल्या शिवायू सुस्त बसणार नाही असेही किरण चन्ने यांनी यावेळी सांगितले.