सार्वजनिक बांधकाम उपअभियंत्यांची खुर्ची खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 03:50 AM2018-08-28T03:50:55+5:302018-08-28T03:51:22+5:30

शहापुरात खड्ड्यांविरोधात आंदोलन : कारभाराचा निषेध, तीन दिवसांपूर्वीच दिला होता इशारा

Public Works Deputy Superintendent's chair in the pothole | सार्वजनिक बांधकाम उपअभियंत्यांची खुर्ची खड्ड्यात

सार्वजनिक बांधकाम उपअभियंत्यांची खुर्ची खड्ड्यात

Next

किन्हवली/शहापूर : शहापूर तालुक्यात सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात आले. तालुक्याचे आ. पांडुरंग बरोरा आणि काँग्रेसच्या महाराष्टÑ प्रदेश सचिव, अपर्णा खाडे यांनी आंदोलन केले. सोमवारपर्यंत खड्डे भरायला सुरुवात झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या खुर्च्या खड्ड्यात ठेवू, असा इशारा तीन दिवसांपूर्वी आ. पांडुरंग बरोरा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना दिला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकाही अधिकाºयाने या इशाºयाची दखल घेतली नाही.

अखेर सोमवारी सकाळी आ. पांडुरंग बरोरा, राष्टÑवादी जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे, सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई खाडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश धानके, मिलिंद देशमुख, बबन हरणे, काशिनाथ तिवरे, किसन भांडे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती निखिल बरोरा, जिल्हा परिषद सदस्य संजय निमसे, मनोज विशे आदी निवेदन देण्यासाठी गेले. मात्र, त्यावेळी उपअभियंता बीलगोजी कार्यालयात हजर नव्हते. ‘भाजपा सरकार हाय, हाय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे करायचे काय, उप अभियंता बिलगोजी यांच करायचे काय’, अशा घोषणा या कार्यकर्त्यांनी दिल्या. अखेर आमदारांनी उपअभियंता एल.एच.बिलगोजी यांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ही खुर्ची घेऊन ती किन्हवली-मुरबाड रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात टाकून रास्ता रोको केला. यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी सावंत, आण िपोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. या संदर्भात आमदार पांडुरंग बरोरा यांनी सांगितले की, शहापूर विधानसभा मतदार संघातील शिरोळ -अजनुप, कसारा गावातून जाणारा रस्ता, आटगाव- पेंढारघोळ - बिरवाडी , धसई - सारंगपुरी-डोळखांब, वेहलोळी- चिरव, मानेखिंड- टाकी पठार, वासिंद -शेरे- शेंद्रुण, किन्हवली-सो-कोचरे, आणि शहापूर गावातून जाणारा रस्ता या रस्त्यांना दोन वर्षे देखभाल दुरूस्तीसाठी व शहापूर - शेणवा-किन्हवली, शहापूर- शेणवा-डोळखांब,शहापूर- लेनाड- मुरबाड, कांबरे- पिवळी-दहागाव, कसारा- वाशाळा- टेंभूर्ली - टोकावडे हे एक वर्ष देखभाल, दुरु स्तीसाठी सुमारे 7 कोटींचा निधी मंजूर केला आहे. गेल्या वर्षी या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून ठरावीक एजन्सीने खूप कमी दराने निविदा भरून कार्यारंभ आदेश होऊनही उशिरा आणि निकृष्ट दर्जाची कामे केल्याने जनतेची गैरसोय झाली.

यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शहापूर- शेणवा- किन्हवली- डोळखांब येथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. दरम्यान, आ. बरोरा यांनी सा.बां. मंत्री चंद्रकांत पाटील यांना एका निवेदनाद्वारे रस्ते दुरूस्तीची कामे अंदाजपत्रकाप्रमाणे झाल्याशिवाय एजन्सीना देयके अदा करू नये तसेच रस्त्यावरील खड्डे दुरु स्तीची तातडीने रस्ते दुरु स्तीची कामे तातडीने सुरू करण्यासंदर्भात आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.

Web Title: Public Works Deputy Superintendent's chair in the pothole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.