कॉस्मिक माईंड , मेडिटेशन अँड डीएनए पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 04:39 PM2018-07-01T16:39:29+5:302018-07-01T16:50:03+5:30

पंडित अत्रे लिखित आणि उद्दवेली बुक्स प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. 

The publication ceremony of Cosmic Mind, Meditation and DNA book concludes | कॉस्मिक माईंड , मेडिटेशन अँड डीएनए पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न 

कॉस्मिक माईंड , मेडिटेशन अँड डीएनए पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न 

Next
ठळक मुद्देकॉस्मिक माईंड , मेडिटेशन अँड डीएनए पुस्तकाचा प्रकाशन सोहळाआपण शाश्वस्त गोष्टींपेक्षा अशाश्वस्त गोष्टींवर जास्त जीव जडवतो - नंदिनी गोरे अझीझ करीम यांनी केले ओंकार साधनेचे महत्व विशद

ठाणे : ध्यान धारणेने डीएनए बदलता येतात का ? या संकल्पनेवर आधारित कॉस्मिक माईंड , मेडिटेशन अँड डीएनए या पंडित अत्रे लिखित आणि उद्दवेली बुक्स प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हॉटेल सत्कार ग्रँड येथे संपन्न झाला .यावेळी मानसतज्ञ नंदिनी गोरे, आंतरराष्ट्रीय योगशिक्षक व मोटिव्हेशनल ट्रेनर अझीझ करीम, ज्योतिष, वास्तुशास्त्र मार्गदर्शक पंडित रविराज, मेडिटेशन गुरु आणि मार्केटिंग तज्ज्ञ प्रसाद गडकरी , प्रकाशक विवेक मेहत्रे आदी उपस्थित होते.

      आजकाल कोणतीही गोष्ट करण्यासाठी घेतल्यास लोकांना त्यांचा निकाल हा चटकन हवा असतो . मात्र त्यासाठी लागणारा अभ्यास, साधना करण्याची लोकांची तयारी नसते. मात्र श्रद्धेने दीर्घ काळ टिकणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करावा तसे  केल्यास तो अधिक चांगला होत असल्याचे मत मानसतज्ञ आणि योगाभ्यासक नंदिनी गोरे यांनी व्यक्त केले. आपण शाश्वस्त गोष्टींपेक्षा अशाश्वस्त गोष्टींवर जास्त जीव जडवतो . मात्र असे करण्यापेक्षा आपण आधी स्वतःकडे बघण्याची गरज आहे. इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःचे गुण दोष ओळखण्याचा प्रयत्न करा असे मत गोरे यांनी व्यक्त केले.  दरम्यान या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते कॉस्मिक माईंड , मेडिटेशन अँड डीएनए या पुस्तकाचे प्रकाशन झाले. २५ वर्षांपूर्वी आणि आजचा काळ यात प्रचंड तफावत आज निर्माण झाली असून आज आजाराचे मूळ कारण हे दमछाकी मध्ये आहे . मात्र आपल्या नंतरची पिढी ही ताण घेण्यासाठी अधिक सक्षम होताना दिसत आहे . त्यामुळे आज आपल्याला शारीरिक आजाराबरोबर मानसिक आजार देखील अधिक वाढीस लागल्याचे दिसून येतात असे  मत गोरे यांनी व्यक्त केले .आज आपल्या आयुष्यात श्वास ही अशी गोष्ट आहे   कि जी खूप महत्वाची आहे मात्र आपण त्याकडे लक्ष देत नाही . मात्र आयुष्य सुदृढ पद्धतीने जगायचे असेल तर श्वासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे नंदिनी गोरे यांनी यावेळी सांगितले. 

योगाचा खरा उद्देश वैयक्तीक  उत्कर्षासाठी आहे . सांघिक योग हा अतिशय आवश्यक आहे पण अष्टांग योगामुळे वैयक्तिक समाधान देतो अशी माहिती यावेळी कॉस्मिक माईंड , मेडिटेशन अँड डीएनए या पुस्तकाचे लेखक पंडित अत्रे यांनी दिली . यावेळी आंतरराष्ट्रीय योगशिक्षक व मोटिव्हेशनल ट्रेनर अझीझ करीम , ज्योतिष , वास्तुशास्त्र मार्गदर्शक पंडित रविराज गुरुजी , मेडिटेशन गुरु आणि मार्केटिंग तज्ज्ञ प्रसाद गडकरी यांची भाषणे झाली . तर कार्यक्रमाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय योगशिक्षक व मोटिव्हेशनल ट्रेनर अझीझ करीम यांनी ओंकार साधनेचे महत्व विशद केले तसेच उपस्थितांकडून ओंकार साधना करून घेतली . पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली .  

Web Title: The publication ceremony of Cosmic Mind, Meditation and DNA book concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.