सरस्वती विद्यालयात स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:44 AM2021-09-22T04:44:21+5:302021-09-22T04:44:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वासिंद : शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या १३ पुस्तकांची निर्मिती सरस्वती विद्यालयातील शिक्षकांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वासिंद : शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या १३ पुस्तकांची निर्मिती सरस्वती विद्यालयातील शिक्षकांनी केली आहे. या पुस्तकांचे प्रकाशन विद्या विकास मंडळाचे चेअरमन विठ्ठल भेरे यांच्या हस्ते करण्यात आले.
सरस्वती विद्यालयात अनेक वर्षांपासून बाह्य परीक्षांमध्ये असंख्य विद्यार्थी यशस्वी होत आहेत. कार्यशाळा, चर्चासत्रे, अभ्यास शिबिरे याद्वारे विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढवण्यासाठी अनेक उपक्रम विद्यालयात राबविले जातात. आतापर्यंत एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातून ४७४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. तर, एनटीएस परीक्षेत सात विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. शिक्षणक्षेत्रात होणाऱ्या बदलांचा विचार करून विद्यार्थ्यांना अद्यावत व गतिमान ठेवण्यासाठी विद्यालयातील शिक्षकांनी कोरोनाच्या काळात अथक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांसाठी १३ पुस्तकांची निर्मिती केली आहे.
यावेळी विद्या विकास मंडळाचे प्राचार्य मीना कांबळे, उपप्राचार्य सुरेश सापळे, पर्यवेक्षक व्ही. टी. भोईर, राजू कार्ले, तसेच मंडळाचे संचालक मंडळ उपस्थित होते.
विद्यालयातील शिक्षक तुकाराम खारीक, किसन निचिते, भाऊ भोईर, मनोहर भोईर, जयश्री घोलप, अरुण भालेकर, श्याम शेलार, सचिन भोईर, एस. टी. भोईर व नयना तूपांगे यांनी वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळेस एवढी पुस्तक तयार केल्याने उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांचे कौतुक करून विद्यार्थ्यांसाठी भविष्यात विविध उपक्रम राबवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
------------------