योगसंवाद ई-पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:26 AM2021-06-22T04:26:56+5:302021-06-22T04:26:56+5:30
डोंबिवली : योगासनांचे खंदे समर्थक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योग १३५ देशांत पोहोचवला, असे ...
डोंबिवली : योगासनांचे खंदे समर्थक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योग १३५ देशांत पोहोचवला, असे प्रतिपादन डॉ. सुनील खर्डीकर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने केले.
अक्षरआनंद पोर्टल आणि जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण यांच्यातर्फे डॉ. योगेश जोशी आणि हेमंत नेहते संपादित योगसंवाद या ई-पुस्तकाच्या ऑनलाइन प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी वैदिक योग परंपरा आणि त्या काळातील जीवनशैली याची माहिती दिली. योगाच्या प्रचार आणि प्रसारार्थ या संस्था जे कार्य करीत आहेत, ते निश्चितच स्पृहणीय असल्याचे ते म्हणाले. जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे प्रेसिडेंट अशोक मेहता यांनी हे ई-पुस्तक जायंट्सच्या माध्यमातून किमान पाच हजार वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस व्यक्त केला.
दरम्यान, हे पुस्तक सर्वांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे प्रकाशक सुनंदा जोशी यांनी सांगितले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी माजी नगरसेविका ज्योती मराठे, राजन मराठे आदींनी सहकार्य केल्याचे नेहते म्हणाले.
-----------------