पब, डान्स बारसह पानटपऱ्या आजपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 02:30 AM2020-03-19T02:30:14+5:302020-03-19T02:30:41+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी निर्णय
ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पब, डिस्को, डीजे, लाइव्ह आॅर्केस्ट्रा बार, डान्स बारसह पान टपºया आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी दिले. मालिकांचे, जाहिरातींचे तसेच चित्रपटांचे चित्रीकरणदेखील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
या आदेशांचे पालन न करणाऱ्यांविरु द्ध अथवा संस्थेविरु द्ध भारतीय दंड संहिता १८६० (४५) यांच्या कलम १८८ शिक्षेस पात्र अपराध केला, असे मान्य करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
देशात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धूम्रपान करणे, यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे असे पदार्थ विक्र ी करणारी दुकाने व पानटपºया इ.वर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था, संघटना, महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२० चे नियम ११ नुसार, भारतीय दंड संहिता (४५ आॅफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार, दंडनीय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.