डाळींचे भाव स्थिर, फळभाज्या मात्र कडाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:42+5:302021-07-23T04:24:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सध्या पावसामुळे फळभाज्यांबरोबर पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. काही भाज्यांनी शंभरी तर काही भाज्यांनी पन्नाशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सध्या पावसामुळे फळभाज्यांबरोबर पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. काही भाज्यांनी शंभरी तर काही भाज्यांनी पन्नाशी गाठली आहे. दुसरीकडे डाळींचे दर मात्र स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सण-उत्सवाच्या आधीपासून भाज्यांना महागाईची फोडणी मिळाली. शनिवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा फटका भाज्यांना बसला. त्यामुळे मोजक्याच भाज्यांची आवक सुरू असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
-----------------------------------
डाळींचे दर (प्रति किलो) हरभरा - ७०
तूर - १२०
मूग - १२०
उडीद - १२०
मसूर - ९० - १००
----------------------------------
फळभाज्यांचे वाढलेले दर (रु. / प्रति किलो)
मटार - १२०
गवार : १२०
टोमॅटो - ३० - ४०
वांगी - ८०
काकडी - ८०
सिमला मिरची - ८०
फ्लॉवर - ८०
कोबी - ८०
गाजर - ८०
भेंडी - ९० - १००
घेवडा - १०० - १२०
पावटा - १०० - १२०
फरसबी - १२० - १४०
------------------------
पालेभाज्यांचे वाढलेले दर (जुडी/प्रतिनग)
कोथिंबीर - ४० - ५०
मेथी - ५०
पालक - २०
-------------------------------
डाळींचे दर वाढलेले नाहीत. सर्वसामान्य रोजच्या जेवणात वरणाचा अधिक वापर करतात म्हणून सर्व डाळींमध्ये तूरडाळ आणि मूगडाळ जास्त खरेदी होत आहे. या महिन्यात तरी डाळींचे दर वाढणार नाहीत.
- पूनम मोरे, किराणा विक्रेत्या
------------------------------
शेतात गुडघाभर पाणी साचते तेव्हा पालेभाज्या खराब होतात, त्यामुळेच दर वाढलेले आहेत.
- संभाजी खेडेकर, पालेभाजी विक्रेते
------------------------------
पावसामुळे भाज्या महाग आहेत. भाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे सर्व भाज्या बाजारात येत नाहीत.
- सीमा शेलार, फळभाज्या विक्रेत्या
--------------------------
गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे दर स्थिर आहेत तर कांदा आणि लसणाचे दर उतरले आहेत. दुसरीकडे मात्र फळभाज्यांबरोबर पालेभाज्यांचेही दर आवाक्याबाहेर आहेत.
- शुभांगी मोरे, गृहिणी