केंद्र सरकारच्या निषेधार्थ डाळविक्रेत्यांचा आज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:44+5:302021-07-16T04:27:44+5:30
ठाणे : केंद्र सरकारच्या डाळींवर साठा मर्यादा घालण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ ग्रोमासह इतर संस्था, धान्य व डाळींचे घाऊक विक्रेते ...
ठाणे : केंद्र सरकारच्या डाळींवर साठा मर्यादा घालण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ ग्रोमासह इतर संस्था, धान्य व डाळींचे घाऊक विक्रेते व मिलर यांनी १६ जुलै रोजी एक दिवसाचा प्रतीकात्मक व्यापार बंद पुकारला आहे. यामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक डाळ विक्रेते ग्राेमासह कल्याण, भिवंडी येथील घाऊक व्यापारी सहभाग घेऊन व्यापार बंद ठेवणार आहेत. यास कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, महाराष्ट्र - (कॅट महाराष्ट्र) यांनी या बंदला पाठिंबा दिला असल्याचे उपाध्यक्ष सुरेश भाई ठक्कर यांनी सांगितले.
डाळींवर साठा मर्यादा घालण्याच्या केेंद्राच्या निर्णयाचा संपूर्ण भारतभर कॅटने विरोध दर्शविला आणि देशातील विविध राज्यांतील डाळी घाऊक विक्रेते आणि मिलर यांना एका व्यासपीठावर एकत्र करून साठा मर्यादेचा निर्णय रद्द करण्याचे आंदोलन सुरू केले आहे. ते यशस्वी करण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांना कॅट पाठिंबा देईल, अशी माहिती त्यांनी दिली.