नाल्यावर पावणेतीन कोटींचा पार्किंग प्लाझा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:38 PM2019-12-17T23:38:54+5:302019-12-17T23:38:56+5:30

कचराळीतील प्रयोग आधीच अयशस्वी : शिवसैनिकांना खूश करण्यासाठी आणला प्रस्ताव

Pune three crore parking plaza on the river | नाल्यावर पावणेतीन कोटींचा पार्किंग प्लाझा

नाल्यावर पावणेतीन कोटींचा पार्किंग प्लाझा

Next

ठाणे : महापालिका मुख्यालयासमोर रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर उतारा म्हणून नाल्यावरील पार्किंगचा प्रयोग पालिकेने केला होता. परंतु, तो सपशेल फेल ठरला आहे. असे असतानाही आता दिवसेंदिवस वाढणाºया वाहनांची संख्या लक्षात घेऊन आणि शिवसेना नगरसेवकाने केलेल्या हट्टापायी महापालिकेने वागळ प्रभाग समिती क्षेत्रातील किसननगर शाखेजवळ असलेल्या नाल्यावर २ कोटी ६३ लाख ७२ हजार ३१४ रुपयांचा खर्चून पार्किंगची सुविधा देण्याची पावले उचलली आहेत. या ठिकाणी शिवसेनेची शाखा आहे, त्यामुळे या शाखेत सकाळ, सांयकाळच्या सुमारास कार्यकर्त्यांची गर्दी असते. त्यामुळे वाहने लावण्यासाठीदेखील येथे कसरत होते. त्यासाठीच हा प्रस्ताव पुढे आणला गेला का, असा सवालही आता उपस्थित झाला आहे.


कचराळी तलाव परिसरातील रस्त्यावर दुर्तफा होणाºया पार्किंगला आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेने प्रथमच नाल्यावरील पार्किंगचा प्रयोग राबवला आहे. यामध्ये ३० पेक्षा अधिक गाड्या पार्क करता येणार आहेत. ११ आॅक्टोबरला २०१५ रोजी या सुविधेचे उद्घाटन करून ती नागरिकांसाठी खुली केली आहे. वाहनचालकांनी तिचा फायदा घ्यावा, म्हणून रस्त्यावर नो पार्किंग झोन करण्याचा विचार पालिकेने केला होता. परंतु, हा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दीड कोटींचा खर्च केला आहे. असे असतानाही आजही गाड्या या ठिकाणी लागण्याऐवजी रस्त्यावरच उभ्या राहत आहेत. त्यामुळे हा प्रयोग फसला आहे. परंतु, आता प्रभाग क्रमांक १७ मधील किसनगर शाखेजवळ असलेल्या नाल्यावर तो केला जाणार आहे.


किसननगरची होणार कोंडी, क्लस्टर प्रस्तावित असल्याने खर्च जाणार वाया
आधीच किसननगरचा भाग हा अतिशय गर्दीचा आहे. त्या ठिकाणी वाहने लावण्यासाठी तारेवरची कसरत होते. त्यातही या भागात क्लस्टर राबविले जाणार आहे. त्यामुळे या नाल्यावरील पार्किंगचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. असे असतांनाही पालिकेने शिवसेना नगरसेवकास खुश करण्यासाठी २ कोटी ६३ लाख ७२ हजार ३१४ रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या नाल्याची लांबी ५५ मीटर व रुंदी ६ मीटर एवढी असून, त्यावर आरसीसी बॉक्स कल्व्हर्ट टाकणे, तसेच त्यावर एक मजल्याचे मेकेनाईज पझल कार पार्किंग सिस्टम उभारली जाणार आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक कॅबिन, नाल्याच्या भिंतीवर अ‍ॅप्रोच तयार करणे आदींचा अंतर्भाव या कामात आहे.

Web Title: Pune three crore parking plaza on the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.