ठाणेकरांच्या स्वारीतून पुणेकरांची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 03:47 AM2018-07-18T03:47:58+5:302018-07-18T03:52:14+5:30

आषाढी एकादशीला जाण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयाने नियोजित केलेल्या बसची बुकिंग जवळपास फूल झाली आहे.

 Puneites turn from Thanekar's departure | ठाणेकरांच्या स्वारीतून पुणेकरांची वारी

ठाणेकरांच्या स्वारीतून पुणेकरांची वारी

googlenewsNext

- पंकज रोडेकर 

ठाणे : आषाढी एकादशीला जाण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयाने नियोजित केलेल्या बसची बुकिंग जवळपास फूल झाली आहे. यंदा नियोजित ७६ बस पंढरपूरच्या वारीसाठी सज्ज झाल्या असून पुण्यातून पंढरपूरला जाणाऱ्याची संख्या जास्त असल्याने त्यांच्या मदतीला ठाणेकर धावून गेले आहेत. त्यांच्या मागणीनुसार ठाणे विभागीय कार्यालयामार्फत ४० बस लवकरच पुण्याला रवाना होणार आहेत. त्यामुळे यंदा ठाणेकरांच्या स्वारीतून पुणेकर पंढरपूरची वारी करणार आहेत.
२३ जुलैच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाणाºया भाविकांकरीता ठाणे परिवहन विभागाकडून ठाणे बस स्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड, बोरीवली नॅन्सी कॉलनी येथून १९ ते २९ जुलै दरम्यान एकूण ७६ जादा बस सोडण्याचे नियोजन आहे. तसेच २४ जुलैपासून चंद्रभागा बसस्थानक, पंढरपूर येथून परतीची वाहतुकीसाठी प्रवासांची गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबाल वृद्धांना प्रवास सुखकर व्हावा म्हणून एकूण जादा बसपैकी १० टक्के बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे बुकिंग एक महिना अगोदर उपलब्ध करून दिले आहे. परतीचे आणि ग्रुप पद्धतीने बुकिंगची व्यवस्था प्रत्येक बसस्थानकावर केली आहे. त्याचप्रमाणे ठाणे परिवहन विभागामार्फत जादा सोडण्यात येणाºया ७६ बसपैकी ६४ गाड्यांची तर पंढरपूरवरून ठाण्यात परत येणाºया १४ गाड्यांची बुकिंग आतापर्यंत फुल झाली आहे.
‘‘ नियोजन केलेल्या बसपैकी ६४ जाणाºया आणि तेथून १४ येणाºया बस फुल झाल्या आहेत. तर,पुणेकरांसाठी पंढरपूरला जाण्यासाठी ठाणे परिवहन विभागामार्फत जवळपास ४० बस लवकरच रवाना होणार आहेत. तसेच पंढरपूर वारीला जाण्यासाठी लोकांची मागणी आल्यास आणखी बस वाढण्यात येतील.’’
- शैलेश चव्हाण, विभागीय नियंत्रक, ठाणे परिवहन विभाग.

Web Title:  Puneites turn from Thanekar's departure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.