वडिलांची हत्या करणाऱ्यास शिक्षा
By Admin | Published: July 15, 2016 01:24 AM2016-07-15T01:24:04+5:302016-07-15T01:24:04+5:30
चिकन आणण्यासाठी घराबाहेर जावू दिले नाही, या रागातून वडिलांच्या हत्या करणाऱ्या मुलाला वसई सत्र न्यायालयाने गुरुवारी सात वर्षांच्या कारावासाची तसेच एक हजा
वसई : चिकन आणण्यासाठी घराबाहेर जावू दिले नाही, या रागातून वडिलांच्या हत्या करणाऱ्या मुलाला वसई सत्र न्यायालयाने गुरुवारी सात वर्षांच्या कारावासाची तसेच एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. वसई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे.भरुका यांनी याप्रकरणी आज निकाल दिला. अजय रामलाल सिंग (वय ३८) असे न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
नालासोपारा पूर्व येथील अलकापुरी येथे असलेल्या रॉयल अपार्टमेंटमध्ये आरोपी अजय रामलाल सिंंग हा त्याची पत्नी व दोन मुलांसोबत राहत होता. त्याचे वडिल रामलाल तारकेश्वर सिंंग त्याच इमारतीमध्ये बाजुच्या फ्लॅटमध्ये राहत होते. १८ जुलै २०१२ रोजी संध्याकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास तो त्याच्या वडिलांच्या घरी गेला होता. यावेळी तो नशेत होता. त्याला चिकन आणण्यासाठी बाहेर जायचे होते. परंतु तो नशेत असल्याने त्याला वडिलांनी मज्जाव केल्याने तो संतापला
होता. (प्रतिनिधी)