६० रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:15 AM2021-02-21T05:15:52+5:302021-02-21T05:15:52+5:30
डोंबिवली : कोरोना बाधितांची संख्या पुन्हा जास्त वाढल्याने नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरु असून डोंबिवलीत दोनपेक्षा जास्त ...
डोंबिवली : कोरोना बाधितांची संख्या पुन्हा जास्त वाढल्याने नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरु असून डोंबिवलीत दोनपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६० रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी पश्चिमेला कारवाई केली.
सहाय्यक वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश्री शिंदे यांनी डोंबिवलीतील विविध चौकात उद्घोषणा करून रिक्षातून फक्त दोन प्रवासी वाहतुकीस परवानगी असून नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे सूचित करण्यात आले. रिक्षाचालक व प्रवाशांनी तोंडावर मास्क लावावे असे आवाहन केले होते. मात्र तरीही काही रिक्षाचालक नियमांचे पालन करत नसल्याने कारवाई केलेल्या रिक्षाचालकांना प्रत्येकी ५०० रुपये दंड भरावा लागला.
मास्क न घालणे,सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांचे पालन करत नसल्याने कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रिक्षाचालकांना आवाहन करूनही जे नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.