पुण्यश्लोक "अहिल्यादेवींवर" नर्मदेचा जलाभिषेक

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 31, 2024 04:05 PM2024-05-31T16:05:15+5:302024-05-31T16:06:56+5:30

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयतीनिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचे नर्मदेच्या तिर्थाने अभिषेक व्हावा, यासाठी नर्मदा तीर्थ पाठविण्यात आले होते.

Punyaslok "AhilyaDevi holkar" Narmada water consecration | पुण्यश्लोक "अहिल्यादेवींवर" नर्मदेचा जलाभिषेक

पुण्यश्लोक "अहिल्यादेवींवर" नर्मदेचा जलाभिषेक

ठाणे : देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जिर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शुक्रवारी २९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्यावतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला. आहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जलाभिषेक व्हावा, यासाठी नर्मदा तीर्थ पाठविण्यात आले होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयतीनिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचे नर्मदेच्या तिर्थाने अभिषेक व्हावा, यासाठी नर्मदा तीर्थ पाठविण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयतीनिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचे नर्मदेच्या तिर्थाने अभिषेक व्हावा, यासाठी नर्मदा तिर्थ पाठविण्यात आले होते. राज्यात सांगली, पुणे,माळेगाव बारामती, पंढरपूर, चौंडी, ठाणे,औंढा नागनाथ, अंबड आदी ठिकाणी हे तीर्थ पोहचले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनश्चर्येत नर्मदा स्नानाचा उल्लेख सापडतो इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडुन युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तिर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी झाली.

ठाण्यातील मासुंदा तलाव येथे आहिल्यादेवीच्या मूर्तीवर शुक्रवारी सकाळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष डॉ राजेश मढवी व माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांच्या हस्ते नर्मदा तीर्थानने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होत्या.तसेच ठाणे महापालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त सोपान भाईक,वार्ड ऑफिसर आनंद पाटील,विकास मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

Web Title: Punyaslok "AhilyaDevi holkar" Narmada water consecration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे