गुढीपाडव्याला ठाण्यात एक हजार ७२३ घरांची खरेदी; यंदाचा नवा उंचाक 

By अजित मांडके | Published: March 23, 2023 05:41 PM2023-03-23T17:41:40+5:302023-03-23T17:45:01+5:30

गुढीपाडव्याच्या उत्साहात घर खरेदी करण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे.

Purchase of one thousand 723 houses on Gudipadawa Thane; A new high this year | गुढीपाडव्याला ठाण्यात एक हजार ७२३ घरांची खरेदी; यंदाचा नवा उंचाक 

गुढीपाडव्याला ठाण्यात एक हजार ७२३ घरांची खरेदी; यंदाचा नवा उंचाक 

googlenewsNext

ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या ठाण्यातील प्रॉपर्टी २०२३ एक्स्पोला २७ हजार कुटुंबियांनी भेट दिल्याने यंदाच्या गुढीपाडव्याला जवळपास १ हजार ५०० घरांची खरेदी होण्याचा अंदाज ठाणे एमसीएचआयने व्यक्त केला होता. पण, अपेक्षा जास्त घरांची ( बुकिंग) खरेदी गुढीपाडव्याला झाली आहे.

यंदा एकूण १ हजार ७२३ घरांची खरेदी झाल्याची माहिती ठाणे एमसीएचआय (क्रेडाई) चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. या गुढीपाडव्याच्या सकारात्मक भावनेचा फायदा घेत ज्या ठाणेकरांनी मालमत्तेची निवड केली, त्यांनी त्यांच्या आयुष्यातील हा सर्वोत्तम निर्णय घेतला. त्याचबरोबर यंदा घर खरेदीचा उंचाक ही गाठला आहे असे ही त्यांनी सांगितले.

गुढीपाडव्याच्या उत्साहात घर खरेदी करण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. त्यातच हा ट्रेंड लक्षात घेत, रिअल इस्टेट डेव्हलपर्स ही रेडी-टू-मूव्ह-इन अपार्टमेंट, बुकिंग ऑफर, लवचिक पेमेंट स्कीम इ. योजनेच्या ऑफर करताना दिसत आहेत.या वर्षी, ठाणेकरांनी या शुभ दिवशी मालमत्तेची निवड केली, हे या वाढत्या शहरासाठी आणि तेथील रहिवाशांसाठी खरे तर ठाणेकरांसाठी एक चांगलेच असल्याचेही मेहता यांनी सांगितले.

तर दुसरीकडे ठाणे हे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर असल्याने, ठाणेकरांच्या पारंपारिक विश्वासांपैकी गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीसाठी आदर्श मानला जातो. या गुढीपाडव्याच्या दिवशी ज्यांचे 'स्वप्नातील घर' प्रत्यक्षात आले अशा अनेक कुटुंबांसाठी नवीन वर्ष साजरे करण्याचा हा उत्तम मार्ग आहे. यात शंका नाही. असेही त्यांनी सांगितले. तर अपेक्षित घर खरेदी पेक्षा निश्चितच यंदा १ हजार ५२३ जणांनी घर खरेदी करून नवा उंचाक गाठला, असेच  म्हणावे लागेल. यात शंकाच नसल्याचे मेहता यांनी शेवटी सांगितले.

Web Title: Purchase of one thousand 723 houses on Gudipadawa Thane; A new high this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.