विधान परिषदेतील बळ वाढवणे हाच हेतू - आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 04:33 AM2018-06-16T04:33:08+5:302018-06-16T04:33:08+5:30

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यापूर्वी शिवसेना ज्याच्या बाजूने असायची, त्याचा विजय व्हायचा. मात्र, यावेळी शिवसेना विधान परिषदेतील आपले संख्याबळ वाढवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरली असून आमचा विजय पक्का आहे, असे उद्गार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी काढले.

 The purpose of strengthening the Legislative Council - Aditya Thakre | विधान परिषदेतील बळ वाढवणे हाच हेतू - आदित्य ठाकरे

विधान परिषदेतील बळ वाढवणे हाच हेतू - आदित्य ठाकरे

Next

कल्याण  - कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यापूर्वी शिवसेना ज्याच्या बाजूने असायची, त्याचा विजय व्हायचा. मात्र, यावेळी शिवसेना विधान परिषदेतील आपले संख्याबळ वाढवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरली असून आमचा विजय पक्का आहे, असे उद्गार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी काढले.
कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे संजय मोरे निवडणूक लढवत आहेत. मोरे यांच्या प्रचारासाठी कल्याण मलंग रोडवरील हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास मागदर्शन करण्यासाठी ठाकरे आले होते. या मेळाव्यात पत्रकारांना प्रवेश देण्यात आला नाही. मात्र, मेळाव्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी विजयाचा दावा केला.
पालघर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याकरिता शिवसेना पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवत आहे का, असा प्रश्न केला असता ठाकरे म्हणाले की, केवळ वचपा काढण्यासाठी निवडणूक लढवली जात नाही. अन्य कारणांसाठीही निवडणूक लढवली जाते. आमच्या पक्षाला विधान परिषदेतील संख्याबळ वाढवायचे आहे.
नवी मुंबईतून या मेळाव्यासाठी येण्यास आदित्य ठाकरे यांना चांगलाच उशिर झाला. शिवसैनिकांची खच्चून गर्दी केलेल्या सभागृहात पदाधिकारी ताटकळले होते.

उद्धव ठाकरेच बोलतील

जळगाव येथे मातंग समाजातील दोन मुलांवर झालेल्या अत्याचारांसंदर्भात ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारली असता याविषयी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच बोलतील, असे ते म्हणाले.

Web Title:  The purpose of strengthening the Legislative Council - Aditya Thakre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.