एसटी कर्मचारी संपाच्या पवित्र्यात, मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 05:45 AM2017-08-12T05:45:45+5:302017-08-12T05:45:45+5:30
गुजरात राज्यात एसटी कर्मचाºयांना सहावा वेतन आयोग लागू झाला असून सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू आहे.
ठाणे : गुजरात राज्यात एसटी कर्मचाºयांना सहावा वेतन आयोग लागू झाला असून सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात एसटी प्रशासनाने सातवा वेतन आयोग देण्यास स्पष्ट नकार दिल्याने आता एसटी कर्मचारीही संपाच्या पवित्र्यात आहेत. तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याचा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष व माजी आ. जयप्रकाश छाजेड यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिला.
या संपाबाबत इंटक आणि मान्यताप्राप्त संघटनेची १७ आॅगस्ट रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर, संपाची तारीख निश्चित होईल. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांनी वेळीच लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी केली. या वेळी इंटकचे ठाणे विभागीय अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर उपस्थित होते. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना देशातील सर्व एसटी कर्मचाºयांच्या वेतनापेक्षा अत्यंत कमी वेतन आहे. सातवा वेतन आयोग लागू न झाल्यास या संपातून आता माघार नाही, असे छाजेड यांनी सांगितले.
९० टक्के कर्मचारी शेतकरी कुटुंबातील
शेतकºयांना ५ कोटींची मदत परिवहन प्रशासनाने दिली आहे. त्याला विरोध नसून परिवहन महामंडळात काम करणारे ९० टक्के कर्मचारी शेतकरी कुटुंबांतील असल्याचेही त्यांनी या वेळी निदर्शनास आणले.
परिवहनमंत्र्यांची अधिकाऱ्यांवर दहशत
परिवहन विभागाच्या इतिहासात पहिलेच परिवहनमंत्री हे त्या विभागाचे चेअरमन आहेत. चेअरमनपदी ते असल्याने त्या विभागातील अधिकाºयांवर त्यांनी दहशत निर्माण केल्याचा आरोप छाजेड यांनी के ला.
एसटी तोट्यात : एसटी महामंडळात दोन हजार शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. त्यातील १,५०० बसेस या भाड्याने घेतल्या असून त्यावर चालक एसटीचे नाहीत. फक्त प्रवासी एसटीचे आहेत. ती सेवा तोट्यात गेल्यावर नुकसानभरपाई महामंडळाला द्यावी लागणार असून अपघात झाल्यास त्याची जबाबदारी एसटीने घेतल्याचे त्यांनी सांगितले.