मेहतांना धक्का
By admin | Published: July 9, 2017 01:53 AM2017-07-09T01:53:53+5:302017-07-09T01:53:53+5:30
बहुजन विकास आघाडीचे राजू व भावना भोईर या नगरसेवक दाम्पत्यां सह भाजपा नगरसेविका सुजाता शिंदे, सुमन कोठारी यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : बहुजन विकास आघाडीचे राजू व भावना भोईर या नगरसेवक दाम्पत्यां सह भाजपा नगरसेविका सुजाता शिंदे, सुमन कोठारी यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांना आणखी एक धक्का देतानाच बविआलासुद्धा चिमटा काढला.
भार्इंदरमध्ये शिवसेनेच्यावतीने गटप्रमुख तसेच विजय संकल्प मेळावा झाला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, प्रवक्त्या व आमदार निलम गोऱ्हे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा, माजी उपनगराध्यक्ष अरु ण कदम आदींच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. सुजाता शिंदे व नरेंद्र मेहता हे एकाच प्रभागातून २०१२ च्या पालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. परंतु काही प्रकरणात शिंदे यांनी विरोध केल्याने मेहतांशी त्यांचे जमत नव्हते. आक्र मक कार्यपध्दतीच्या शिंदे यांनी स्वबळावरच काम चालवले होते. बविआच्या राजू भोईर व भावना भोईर या नगरसेवक दाम्पत्याला भाजपात घेण्यासाठी मेहतांनी प्रयत्न चालवले होते.