ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर हृदयस्पर्शी 'निशब्द रात्र' एकांकिकेने प्रेक्षकांना ठेवले खिळवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 04:43 PM2019-03-18T16:43:51+5:302019-03-18T16:46:39+5:30
निशब्द रात्र' एकांकिकेने प्रेक्षकांना अभिनय कट्ट्यावर खिळवून ठेवले.
ठाणे : 'निशब्द रात्र'....माणसाची जिंदगानी म्हणजे जन्म ते मरण ह्या दोन स्टेशनामधील एक प्रवास कधी गाडी चालते कधी थांबते कित्येक अपघात कधी सुखाची वाट पण चालत राहायचं जगत राहायचं हा नियम जगण्याचा.पण कधी कधी जगण्याचे अर्थ विस्कटून जातात नात्यांमधली वीण उसवते सार सार व्यर्थ भासू लागत आणि दिशाहीन दिवसानंतर उरते आयुष्यात ती एक 'निशब्द रात्र'. अशाच एका रात्रीची गोष्ट अभिनय कट्टा क्रमांक ४२० सादर एकांकिका 'निशब्द रात्र'.
एका सत्यघटनेवर आधारित कदिर शेख ह्यांच्या संकल्पनेवर आधारित ही निशब्द रात्र.माथाडी कामगारांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी गरिबी भूक अशा अभिशाप लाभलेल्या माणसाच्या जगण्यातील पैशाच अस्तित्व म्हणजे कदिर शेख दिग्दर्शित एकांकिका 'निशब्द रात्र'.भुकेन व्याकुळ मुलांच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या आईची गोष्ट ..भुकेसमोर नाईलाज म्हणून मुलाला बळी देऊन पुढील जगण्याचा दिवस ढकलण्याचा निर्णय घेणाऱ्या बापाची गोष्ट.. चांगल्या वाईट अनुभवातून जगन जाणलेल्या एक खाटीकाची गोष्ट.. आयुष्याचा अर्थ हव्यास आणि फक्त मौज आशा निष्ठुर मुकादमाची गोष्ट... म्हणजे निशब्द रात्र. उत्तम अभिनय,साजेशी प्रकाशयोजना साजेसं पार्श्वसंगीत आणि कथानकाला चित्रित करणारा साजेसं नेपथ्य आणि त्याला अनुभवी दिग्दर्शनाची जोड ह्यातून निर्माण झालेल नाट्यमय सादरीकरण म्हणजे 'निशब्द रात्र'. सदर एकांकिकेत भिवाची भूमिका आदित्य नाकती शेवंतांची भूमिका न्यूतन लंके सुलेमान चाचा ची भूमिका अजित भोसले आणि मुकादमची भूमिका सहदेव कोळंबकर ह्यांनी साकारली.सादर एकांकिकेचे पार्श्वसंगीत परेश दळवी, प्रकाशयोजना विजया साळुंके ह्यांनी सांभाळले.सदर एकांकिकेचे नेपथ्य शनी जाधव,सहदेव साळकर आणि परेश दळवी ह्यांनी उभारले. एकांकिका खरोखरच मनाला भिडली.माथाडी कामगारांचा जीवन वास्तवरूपी साकारण्यात आलेलं.आई मुलाचं नात, नवरा बायकोच नात, माणसाचं माणसाशी असलेलं माणूसकीच नात खूप सुंदर रित्या एकांकिकेत मांडल होत.प्रत्येकाचा अभिनय,प्रकाशयोजना,संगीत,नेपथ्य ह्याच्या सोबतीने 'निशब्द रात्र' ही गोष्ट मनाला स्पर्शून गेली.असे मत उपस्थित प्रेक्षकांनी व्यक्त केले. अभिनय कट्ट्यावर अनेक एकांकिका सादर झाल्यात प्रत्येक एकांकिका तिची वेगळी छाप सोडून जाते हा इतिहास आहे. प्रत्येक कलाकृती उपस्थित प्रेक्षकांचं मनोरंजन करून जाते. हे सर्व रसिकहो फक्त तुमच्याच आशीर्वादामुळे.आजची एकांकिकाही अभिनय, प्रकाश,संगीत, आणि नेपथ्याच्या जोरावर वेगळी छाप सोडून गेली.विक्रमी ४२० कट्ट्याच्या प्रवासात दर रविवारी अभिनय कट्ट्यावर, दर गुरुवारी वाचक कट्ट्यावर आणि दर शुक्रवारी संगीत कट्ट्यावर कलाकार वेगवेगळे सादरीकरण करत रसिकांचे मनोरंजन करत आहेत आणि करत राहणार. ही ताकद तुमच्याच आशीर्वादामुळे म्हणून तुमची कौतुकाची आणि आशीर्वादाची साथ सदैव राहूदे असे आवाहन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी उपस्थित प्रेक्षकांना केले. सदर एकांकिकेचे निवेदन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी केले.