सरकार सेवा केंद्रावर शुल्क फलक लावा; जिल्हाधिकारी कार्यालयाचे फर्मान, कारवाईचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 07:00 PM2021-12-13T19:00:34+5:302021-12-13T19:01:27+5:30
आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास केंद्र चालकांवर कारवाईचे संकेत दिल्याची माहिती विशाल जाधव यांनी दिली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : सरकारच्या आधार केंद्र, सेतू केंद्र व विविध ई-सेवा केंद्रा बाहेर दर्शनी भागावर शुक्ल फलक लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास केंद्र चालकांवर कारवाईचे संकेत दिल्याची माहिती विशाल जाधव यांनी दिली.
उल्हासनगर मधील माहिती कार्यकर्ता विशाल जाधव यांनी शासनाच्या ई-सेवा केंद्र, आपले सेवा केंद्र, सेतू केंद्र व आधार केंद्रामध्ये सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, तसेच शासकीय दस्तऐवज व प्रमाणपत्रासाठी भटांकती होऊ नये. यासाठी शासन निर्णय १९ जानेवारी २०१८ च्या मार्गदर्शन सुचनेद्वारे सरकारच्या विविध सेवा केंद्रातील नोटीस बोर्डवर ठळकपणे शुक्ल फलक लावण्याची मागणी जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला केली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाने जाधव यांच्या मागणीची दखल घेऊन ७ डिसेंबर रोजी सेवा केंद्र चालकांना एक आदेश जाहीर केला. आधारकार्ड, जातीचा दाखला, आदिवास दाखला, शपथपत्र, रेशन कार्ड आदी सेवेसाठी लागणारे सेवा शुल्क केंद्राच्या बोर्डवर ठळकपणे लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने केंद्र चालकात खळबळ उडाली असून आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास केंद्र चालकांचा परवाना रद्द करण्याचे संकेत आदेशात दिले. बहुतांश आधारकेंद्र , तहसील कार्यालयातील सेतू केंद्रासह अन्य सरकार सेवा केंद्रावर कोणत्या दस्तऐवज व प्रमाणपत्रासाठी किती शुल्क लागते. या शुल्काचे फलक दर्शनी भागात लावले नसून फलकांवर जुनेच शुल्क व दस्तऐवज कधी मिळेल. आदींची माहिती केंद्राच्या बोर्डवर जुनीच असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी अश्या केंद्राची माहिती थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्याचे आवाहन माहिती कार्यकर्ता विशाल जाधव यांनी केले.