महापालिका क्षेत्रात कॅमेरे लावा
By admin | Published: November 25, 2015 01:24 AM2015-11-25T01:24:36+5:302015-11-25T01:24:36+5:30
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेऊन त्यांना महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही लावण्याच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले
डोंबिवली : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेऊन त्यांना महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही लावण्याच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. एका खासगी कंपनीच्या सहकार्याने त्यांनी प्रकल्प सादर केला. यात सीसीटीव्हीबरोबरच मोबाइल आणि वायफाय यांची सुविधाही उपलब्ध आहे. शहरामधील सीसी कॅमेरे बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊनच खासदारांनी आयुक्तांची भेट घेतल्याचीही चर्चा सर्वत्र रंगली होती.
या प्रकल्पाची उपयुक्तता म्हणजे गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच अनधिकृतरीत्या रस्त्यांवर बसणारे फेरीवाले तसेच शहराचे विद्रुपीकरण करणारे होर्डिंग्ज यांची माहिती सदर सीसीटीव्हीमधून महापालिकेला त्वरित समजू शकेल. त्याचप्रमाणे याचा उपयोग वाहतुकीची कोंडी झाल्यास सदर माहिती वाहतूक पोलिसांनाही त्वरित समजू शकेल व त्यावर पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वाहनचालकांना तशा सूचनाही देता येणे शक्य होऊ शकेल.
बैठकीला महापौर राजेंद्र देवळेकर, गटनेते रमेश जाधव, कल्याण महानगरप्रमुख विजय साळवी व अनेक नगरसेवक तसेच प्रकल्प अधिकारी प्रमोद कुलकर्णी उापस्थित होते. (प्रतिनिधी)