पाण्यासाठी अधिकाऱ्यांना ठेवले कोंडून
By admin | Published: January 5, 2017 05:31 AM2017-01-05T05:31:37+5:302017-01-05T05:31:37+5:30
तारापुर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आत ठेवूनच नांदगांव तर्फे (तारापुर) च्या ग्रामस्थांनी मंगळवारी (दि ३) संध्याकाळी टाळे ठोकताच पाण्याच्या पाईप
बोईसर : तारापुर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आत ठेवूनच नांदगांव तर्फे (तारापुर) च्या ग्रामस्थांनी मंगळवारी (दि ३) संध्याकाळी टाळे ठोकताच पाण्याच्या पाईप लाईनचे लेखी आश्वासन देण्यात आले.
नांदगांवच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच विधि मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यांत आलेल्या या आंदोलनात उपसरपंच शर्मीला राऊत सदस्य धीरज गावड विकास पाटील पांडुरंग महाले मनसे तालुका अध्यक्ष समिर मोरे यांच्या सह महिला व ग्रामस्त सहभागी झाले होते. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा च्या तारापुर विभागा तर्फे सीटीपीतून रासायनिक पाणी समुद्रात सोडण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईप लाईन च्या कामाच्या दरम्यान गावाला पाणी पुरवठा करणारी लाईन तोडल्याने ग्रामपंचायत चे सुमारे १५ ते २० लाखाचे नुकसान झाले असून तेव्हा पासून पाईप लाईन तुटलेल्या अवस्थेतच असून गावाला पाणी पुरवठा योजनेतुन पाणी मिळू शकले नाही.
या बाबात २७ जानेवारी २०१६ पासून अनेक वेळा ग्रामपंचायती तर्फे लेखी निवेदन देवुनही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून दिशाभूल केल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळे ठोकुन अधिकाऱ्यांसह कर्माचाऱ्यांना कार्यालयातच बंद करून ठेवल होते त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
२००७ साली जलस्वराज मधुन नांदगांव गावात पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली परंतु आजतागायत पाणीपुरवठा झाला नाही. ग्रामस्थांनी एम आय डी सी कडे पाण्याची मागणी केली असता त्यांनी जिल्हा परिषद कडे बोट दाखवले होते तर लाखो रूपये खर्च करून ही योजना आजही बंद अवस्थेत आहे. महामंडळाचे ठाणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वस्तूस्थिती संगीतल्यानंतर आंदोलकांना १५ दिवसात पाईप लाईन दुरूस्ती चे काम करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)