प्रा. वसंतराव कानेटकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:36 AM2021-03-15T04:36:44+5:302021-03-15T04:36:44+5:30
ठाणे : ज्येष्ठ नाटककार, लेखक, इतिहासकार दिवंगत प्रा. वसंतराव कानेटकर यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष आहे. २० मार्च २०२१ ते ...
ठाणे : ज्येष्ठ नाटककार, लेखक, इतिहासकार दिवंगत प्रा. वसंतराव कानेटकर यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष आहे. २० मार्च २०२१ ते २०२२ या कालावधीत चालणाऱ्या सोहळ्यात कानेटकर यांची सून अंजली, नातू अंशुमन, कानेटकरांचे चाहते, रसिक, नाटककार, कलाकार हे सहभागी होणार आहेत. प्रा. कानेटकर यांनी ५० वर्षांच्या नाट्यलेखनाच्या कारकिर्दीत एकूण ४१ नाटके लिहिली. त्यात अश्रूंची झाली फुले, रायगडाला जेव्हा जाग येते, प्रेमाच्या गावा जावे, लेकुरे उदंड जाली, इथे ओशाळला मृत्यू अशा अनेक नाटकांचा समावेश आहे. या सोहळ्यात आपापल्या मंडळातर्फे कानेटकरांचे प्रयोग, अभिवाचन, नाट्यगायन, नाट्यस्पर्धा भरवून अथवा चर्चासत्रे इतर माध्यमातून आयोजित करून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ज्येष्ठ नाटककार, लेखक, दिग्दर्शक अशोक समेळ यांनी केले आहे.