पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांचे एनपीएस हटाव आंदोलन, बमुदत संपाचा इशारा

By सुरेश लोखंडे | Published: November 25, 2022 06:51 PM2022-11-25T18:51:10+5:302022-11-25T18:51:58+5:30

या राज्यस्तरीय साप्ताहीक आंदोनात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती घटनेच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणीआंदोलन छेडले

PWD employees' NPS removal protest, warning of indefinite strike in thane | पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांचे एनपीएस हटाव आंदोलन, बमुदत संपाचा इशारा

पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांचे एनपीएस हटाव आंदोलन, बमुदत संपाचा इशारा

Next

ठाणे - सरकारी व निमसरकारी कर्मचाºयांना जुनी पेन्शन तत्काळ लागू करून एनपीएस ही पेन्शन तत्कळ हटवण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यातील जिल्हा व तालुका स्तरावर पाच दिवशीय आंदोलन छेडले. आज शेवटच्या व समारोपाच्या दिवशी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) आवारात जिल्हाधिकारी कार्यालयासह या पीडब्ल्यूडी विभागातील कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडून बेमुदत संपाचा इशाराही राज्य शासनाला दिला आहे.
            
या राज्यस्तरीय साप्ताहीक आंदोनात जिल्ह्यातील कर्मचाºयांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती घटनेच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणीआंदोलन छेडले. या कर्मचाºयांचे नेतृत्व या संघटनेच्या अध्यक्षा प्राची चाचड व सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी केले. यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासह पीडब्ल्यूडी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींसह जिल्हा परिषद कर्मचाºयांनी या साप्ताहीक आंदोलन कालावधीत सहभाग घेतला. आज या सप्ताहीक आंदोलनाचा शेवटचा दिवस होता. या साप्ताहीक आंदोलनाची त्वरीत दखल घ्यावी अन्यथा फेब्रुवारीत बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशाराही या कर्मचाऱ्यांनी आज दिला.
                         
सरकारी कार्यायातील कर्मचारी जिल्हा व तालुकापातळीवर दुपारच्या वेळी कार्यालयासमोर एकत्र येऊन जुन्या पेन्शनची मागणी लावून धरत एनपीएस हटवची मागणी या व्दारसभामध्ये कर्मचाºयांनी केली आहे. जिल्हा मुख्यालया प्रमाणेच तालुका स्तरावरील मध्यवर्ती ठिकाणी कर्मचाºयांना एकत्र करून ‘एनपीएस हटव’ मोहिमेचा प्रचार आणि प्रसार केला. यावेळी ‘बेमुदत संप’ करण्याची जनजागृतीही करण्यात आली. या‘बेमुदत संपामध्ये सहभागी होणारा कर्मचारी जिल्ह्यातील कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अधिकृत सभासद करून घेण्यात आले.
 

Web Title: PWD employees' NPS removal protest, warning of indefinite strike in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.