एमडी पावडरप्रकरणी ठाण्यात चौकडी गजाआड

By admin | Published: July 17, 2017 01:00 AM2017-07-17T01:00:40+5:302017-07-17T01:00:40+5:30

शहरातील महाविद्यालये आणि गृहसंकुलांच्या परिसरात तरुणांना नशेसाठी एमडी पावडरचा पुरवठा करणाऱ्या एका चौकडीला

Quadradi Gajaad Thane Thane Threat to MD Powder | एमडी पावडरप्रकरणी ठाण्यात चौकडी गजाआड

एमडी पावडरप्रकरणी ठाण्यात चौकडी गजाआड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरातील महाविद्यालये आणि गृहसंकुलांच्या परिसरात तरुणांना नशेसाठी एमडी पावडरचा पुरवठा करणाऱ्या एका चौकडीला ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. यामध्ये त्या टोळीच्या म्होरक्याचाही समावेश असून त्यांच्याकडून २५० ग्रॅम वजनाची एमडी पावडर हस्तगत केली आहे.
वागळे इस्टेट, हाजुरी येथे काही जण एमडी पावडर विकण्यासाठी येणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे आणि सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने सापळा लावून जमीर शेख (२८) आणि मोबिन अन्सारी (२६) यांना अटक केली. या वेळी त्यांच्याकडून ११५ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. त्यांनी हा माल मुंब्य्रातील शाहरूख शेख (२९) याच्याकडून खरेदी केल्याचे समोर आल्यावर त्याला अटक केली.

Web Title: Quadradi Gajaad Thane Thane Threat to MD Powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.