ठाण्यात क्वारन्टाइन रुग्णांचे हाल, अहवाल येण्यास होतोय विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 02:38 PM2020-04-15T14:38:38+5:302020-04-15T14:39:15+5:30

क्वारन्टाइन करुन ठेवण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या ठिकाणी वीजेचा खोळंबा, नाश्ता वेळेत न मिळणे, अहवाल उपलब्ध होण्यास विलंब होणे आदी बाबींमुळे येथील क्वारन्टाइन रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत.

Quarantine condition of patients, reports are delayed | ठाण्यात क्वारन्टाइन रुग्णांचे हाल, अहवाल येण्यास होतोय विलंब

ठाण्यात क्वारन्टाइन रुग्णांचे हाल, अहवाल येण्यास होतोय विलंब

Next

ठाणे : कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाण्यात संशयित रूग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर उभे करण्यात आले आहेत. डॉ. केंद्रे यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे क्वारंटाईन केलेल्या रूग्णांचे खाण्यापिण्याचेही हाल होत आहेत. या संदर्भात डॉ केंद्रे यांच्याशी संपर्कसाधूनही उपाययोजना केल्या जात नसल्याची माहिती माजी विरोधी पक्ष नेते मिलींद पाटील यांनी दिली.
                 ठाणे शहरातील सिव्हील रूग्णालय आणि पातलीपाडा येथे ठामपाच्या अखत्यारीत संशयित कोरोना रूग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर उभे करण्यात आले आहे. या सेंटर मध्ये अनेक संशयित रूग्णांना ठेवण्यात आले आहे. कळवा परिसरातील चार जण या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहेत. स्वॅबचा नमुना १२ दिवसांपूर्वी नेण्यात आला असून त्याला नंतर सिव्हील रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्याचा अहवाल देण्यात आलेला नाही. तर या ठिकाणी एका दीड वर्षाच्या मुलीलाही क्वारंटाईन करण्यात आले असून तिच्या दुधाचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. येथील स्थानिक नगरसेवकाकडून या मुलीला दुधाचा पुरवठा करण्यात येत आहे. तर या क्वारंटाईन रु ग्णांना नाश्तादेखील दुपारी १२ वाजता देण्यात येत आहे. दुसरीकडे पातलीपाडा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये कळव्यातील दोन मुली आहेत. या ठिकाणीही अहवाल येत नसल्याने त्यांना नाहक अडकून पडावे लागले आहे. या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे सर्वत्र अंधार दाटत असल्याने अघटीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुलींच्याही जेवणाखाण्याची मोठी अबाळ होत आहे. सदर रूग्णांनी ही माहिती आपणाला दिल्यानंतर आपण डॉ. केंद्रे यांना त्याची माहिती दिली. मात्र, त्यांनी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे केंद्रे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच क्वारंटाईन करण्यात आलेल्या रूग्णांना सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
 


  • जिल्हा शासकीय रुग्णालयाशी माझा संबंध येत नाही. माझ्यावर केवळ रु ग्णांचा रेकॉर्ड ठेवणे आणि त्यांच्यावर व्यविस्थत उपचार होतात कीनाही हे पाहणे आहे. भार्इंदर पाडा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये नाश्ता आणि इतर सुविधांची जबाबदारी इतरांवर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे माझा काहीही संबंध नसताना असे आरोप माझ्यावर करणे चुकीचे आहे

- डॉ. आर टी केंद्रे,
विशेष कार्य अधिकारी, कोरोना सेल

 

Web Title: Quarantine condition of patients, reports are delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.