ठाणे शहर आयुक्तालयातील २४ अधिकाऱ्यांसह १६४ पोलिसांना केले कॉरंटाइन

By जितेंद्र कालेकर | Published: April 21, 2020 09:26 PM2020-04-21T21:26:35+5:302020-04-21T21:33:29+5:30

कोरोनाचा ठाणे शहर पोलिसांनाही चांगलाच फटका बसला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यातील आणखी एका कर्मचा-याला लागण झाल्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १८ वर पोहचली आहे. आतापर्यंत २४ अधिका-यांसह १६४ पोलिसांना कॉरंटाईनमध्ये राहण्याची आफत ओढवली आहे.

Quarantine made to 164 policemen, including 24 officers of Thane city commissionarate | ठाणे शहर आयुक्तालयातील २४ अधिकाऱ्यांसह १६४ पोलिसांना केले कॉरंटाइन

मुंब्य्रातील आणखी एकामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १८

googlenewsNext
ठळक मुद्देमुंब्य्रातील आणखी एकामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १८सामान्य नागरिकांच्या संपर्कामुळे सहा अधिकारी ३७ कर्मचाऱ्यांवर होम कॉरंटाईन होण्याची आफत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंब्रा पोलीस ठाण्यातील आणखी एका कर्मचा-यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता १८ वर पोहचली आहे. तर २४ अधिकारी आणि १४० कर्मचारी अशा १६४ पोलिसांना कॉरंटाईन अर्थात विलगीकरणामध्ये ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत पोलीस मुख्यालयातील सहा कर्मचारी, मुंब्रा पोलीस ठाण्याचे चार कर्मचारी आणि तीन अधिकारी, नारपोलीतील एक कर्मचारी आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे तीन अशा चार अधिकारी आणि १४ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. ही संख्या आता १८ च्या घरात गेली आहे. कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कामुळे मुंब्रा पोलीस ठाण्याचे आठ अधिकारी आणि १५ कर्मचारी, मुख्यालयाचे २६ कर्मचारी, नारपोलीचा एक, वर्तकनगरचे तीन अधिकारी आणि २७ कर्मचारी अशा ११ अधिकारी आणि ६९ कर्मचा-यांना होम कॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तर मुंब्रा येथील सात अधिकारी ३० कर्मचारी, मुख्यालयाचे तीन कर्मचारी आणि वाहतूक शाखेचा एक कर्मचारी अशा सात अधिकारी आणि ३४ कर्मचाºयांना केंद्रामध्ये कारंटाईन केले आहे.
* याव्यतिरिक्त खासगी व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे ठाणे परिमंडळातील दोन अधिकारी दोन कर्मचारी, भिवंडीतील दोन कर्मचारी, कल्याणमधील एक अधिकारी एक कर्मचारी, वागळे इस्टेटमधील दोन अधिकारी पाच कर्मचारी, वाहतूक शाखेचे दहा कर्मचारी तर गुन्हे अन्वेषण विभागातील दोन कर्मचारी अशा सहा अधिकारी आणि ३७ कर्मचाºयांना होम कॉरंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: Quarantine made to 164 policemen, including 24 officers of Thane city commissionarate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.