जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थी सव्वा लाख; अकरावीच्या जागा मात्र ८३ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:32+5:302021-08-20T04:46:32+5:30
ठाणे : जिल्ह्यात यंदा दहावीचे १ लाख २३ हजार २०८ विद्यार्थी गुणवत्तेत उत्तीर्ण करण्यात आले. आहे. मात्र, या ...
ठाणे : जिल्ह्यात यंदा दहावीचे १ लाख २३ हजार २०८ विद्यार्थी गुणवत्तेत उत्तीर्ण करण्यात आले. आहे. मात्र, या विद्यार्थ्यांची आता अकरावीच्या वर्गात प्रवेश देण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. यासाठी जिल्ह्याभरात कला शाखेसह सायन्स, वाणिज्यच्या अवघ्या ८२ हजार ९८० जागा आहेत. त्यात टक्केवारी मिळवणारे विद्यार्थी अधिक आहेत. त्यामुळे हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना मात्र योग्य शाखेला जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
कोरोनाच्या भीतीने यंदा परीक्षा झाल्या नाही. शाळांनी अंदाजाने गुण देऊन टक्केवारी फुगवली. त्या जोरावर विद्यार्थी हौसेने सायन्स, वाणिज्य आणि तांत्रिक विभागाला प्रवेश घेऊन जागा अडवतील. पण त्यांची हुशारी एक वर्षानंतर त्यांना कळेल पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल आणि त्यामुळे होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले असेल. सर्वाधिक निकाल लागल्याने यंदा ५६ हजार ८४५ विद्यार्थिनी आणि ५६ हजार ३६३ विद्यार्थी डिस्टिंगशनने उत्तीर्ण झाले आहेत.
या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशासाठी बुधवारपर्यंत लाखभर अर्ज आले आहेत. आता दुसऱ्या टप्प्याला म्हणजे महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. २३ ऑगस्ट रोजी तात्पुरती यादी प्रदर्शित होऊन पहिली गुणवत्ता यादी २७ ऑगस्टला जाहीर होणार आहे. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात ८३ हजार जागांपैकी आर्टच्या १०८४०, सायन्सच्या २८ हजार ५८०० आणि वाणिज्यच्या ४२,७८०० जागा आहेत. याशिवाय एचएसव्हीसीच्या ७९० जागा जिल्ह्यात आहेत.
-------
जिल्ह्यातील बहुतांशी विद्यार्थी तांत्रिक शाखेला प्रवेश घेतात आणि काही अन्य जिल्ह्यातील मोठ्या महाविद्यालयात प्रवेश घेतात. त्यामुळे आतापर्यंत गेल्या वर्षाच्या जागांवर प्रवेश अर्ज घेतले जात आहे. अजून प्रवेश जागा निश्चित झाल्या नाही. त्या आवश्यकतेनुसार वाढतील.- शेषराव बढे, शिक्षणाधिकारी, ठाणे.
-----------