डॉक्टरांच्या वास्तव्याचा प्रश्न निघाला निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:32 AM2021-04-29T04:32:11+5:302021-04-29T04:32:11+5:30

कल्याण : ठाणे ग्रामीण भागासाठी सावद येथे एक हजार बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. ते ग्रामीण भागात असल्याने ...

The question of the doctor's whereabouts was settled | डॉक्टरांच्या वास्तव्याचा प्रश्न निघाला निकाली

डॉक्टरांच्या वास्तव्याचा प्रश्न निघाला निकाली

Next

कल्याण : ठाणे ग्रामीण भागासाठी सावद येथे एक हजार बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. ते ग्रामीण भागात असल्याने त्याठिकाणी सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि वार्डबॉय यांच्या वास्तव्याचा प्रश्न होता. या प्रकरणी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून डॉक्टर, नर्स आणि वाॅर्डबॉय यांच्या वास्तव्याची सोय केली आहे.

कल्याण तालुक्यातील बापगाव परिसरात हावरे बिल्डर्सच्या गृह संकुलात डॉक्टर, नर्स आणि वाॅर्डबॉय यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे सांगण्यात आले. तेव्हा हावरे यांनी त्यांच्या प्रकल्पातील ५० फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत. त्याठिकाणी जवळपास १५० जणांना वास्तव्य करता येणार आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा देत असताना त्याठिकाणाहून घरी जाणे, पुन्हा कोविड रुग्णालयात जाणे डॉक्टर, नर्स आणि वाॅर्डबॉय यांना शक्य नसल्याने त्यांची वास्तव्याची अडचण लक्षात घेता ही सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाचे अंतर वाचणार असून त्यांना सावद कोविड रुग्णालयात आरोग्य सेवा देणे शक्य होणार आहे.

-------------------------------

Web Title: The question of the doctor's whereabouts was settled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.