उल्हासनगरात तब्बल ५० हजार कुटूंब गॅस सिलेंडर विना, पंतप्रधानाच्या गॅस जोडणी योजनेवर प्रश्नचिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 07:46 PM2018-01-30T19:46:50+5:302018-01-30T19:47:03+5:30
शहरातील १ लाख ३१ हजार शिधापत्रिकाधारका पैकी तब्बल ५० हजार कुटूंब गॅस सिलेंडर विना आहेत. रॉकेल, लाकुड, लागडाचा लगदा व गोव-यावर स्वयंपाक केला जात असून याबाबत
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील १ लाख ३१ हजार शिधापत्रिकाधारका पैकी तब्बल ५० हजार कुटूंब गॅस सिलेंडर विना आहेत. रॉकेल, लाकुड, लागडाचा लगदा व गोव-यावर स्वयंपाक केला जात असून याबाबत असंख्य तक्रारी शिवसेनेच्या अपंग सेलकडे आल्याची माहिती भरत खरे यांनी दिली.
उल्हासनगरात पुर्वे व पश्चिम असे दोन शिधावाटप कार्यालय आहेत. दोन्ही कार्यालयात एकून १ लाख ३१ हजार शिधावाटप कार्डधारकांची संख्या असून त्यापैकी ५० हजार कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर जोडणी नाही. त्यांना स्वयंपाकासाठी आजही रॉकेल, लाकडे, लाकडाचा लगदा व गोव-याचा वापर करावा लागत आहे. पंतप्रधान मोदी सरकारची मोफत गॅस सिलेंडर जोडणी गेली कुठे?. असा प्रश्न शिवसेनेच्या अपंग सेलचे भरत खरे यांनी शासनाला केला. तर स्वस्त दराचे रॉकेल लाटण्यासाठी, कार्डधारकांची फुगीर संख्या दाखविल्याचा आरोप सर्वस्तरातून होत आहे.
शहरातील शिधावाटप अधिकारी शंकर होणमाने व जगन्नाथ सानप यांनी शहरातील एकून कार्डधारका पैकी ४० टक्के कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर नसल्याची माहिती दिली. तसेच शासनाच्या अन्न सुरक्षा योजने अंतर्गत ९२ हजार कार्डधारक येत असून त्यांचे उत्पन्न ६९ हजाराच्या कमी आहे. गहु २ रूपये किलो तर तांदुळ ३ रूपये दराने त्यांना शिधावाटप दुकाना मार्फत दिले जाते. शिधावाटप पुर्वे कार्यालयात एकून ५६ हजार कार्डधारक पैकी तब्बल २१ हजार कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर नाही. तर शहर पश्चिमेतील शिधावाटप कार्यालयात ७५ हजार कार्डधारक असून त्यापैकी ३१ हजार कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर जोडणी नसल्याचे उघड झाले. स्वस्त दराचे रॉकेल लाटण्यासाठी गॅस जोडणी नसलेल्या कार्डधारकांची संख्या जास्त दाखविल्याची टिका होत आहे.
निरिक्षकाकडून चुकीचे सर्वेक्षण
शहरातील तब्बल ४० टक्के कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर जोडणी नसल्याचे दाखविले. रॉकेल लाटण्यासाठी असी संख्या दाखविल्याचा आरोप होत असून शिधावाटप निरिक्षकांनी चुकीचे सर्वेक्षण केल्याचा आरोप होत आहे.
गरीबांच्या तोंडाचा घास पळविला
शिवसेना अपंग सेलचे भरत खरे यांनी शिधावाटप निरिक्षकांनी चुकीचे सर्वेक्षण केल्याने, शेकडो नागरिक स्वस्त धान्या पासून वंचित झाल्याचे सांगितले. गरजु नागरिकांच्या समस्या शिधावाटप अधिकां-यानी सोडल्या नाहीतर, शिवसेनेच्या स्टाईलने आंदोंलन करण्याचा इशारा निवेदनाद्बारे देण्यात आला.