‘इतर’च्या नोंदीने चौघींच्या रिक्षा परवान्यांवर प्रश्नचिन्ह
By admin | Published: January 22, 2016 03:31 AM2016-01-22T03:31:40+5:302016-01-22T03:31:40+5:30
रिक्षा परवान्यासाठी सायबर कॅफेत आॅनलाइन अर्ज भरताना तेथील कर्मचाऱ्याकडून झालेल्या क्षुल्लक चुकीने चार महिलांचे रिक्षाचालक-मालक होण्याचे स्वप्न जवळपास भंग
ठाणे : रिक्षा परवान्यासाठी सायबर कॅफेत आॅनलाइन अर्ज भरताना तेथील कर्मचाऱ्याकडून झालेल्या क्षुल्लक चुकीने चार महिलांचे रिक्षाचालक-मालक होण्याचे स्वप्न जवळपास भंग पावले आहे. या चौघींना नवे परवाने मिळण्याची वाट पाहावी लागणार आहे; शिवाय शासन दुरुस्तीबाबत निर्णय घेते का, हेही पाहावे लागणार आहे.
परवान्यांच्या आॅनलाइन लॉटरीत महिलांना प्रथमच ५ टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांनी उत्साह दाखविला होता. अर्जात स्त्री, पुरुष आणि इतर असे पर्याय होते. या महिलांच्या अर्जात ‘इतर’ हा पर्याय सिलेक्ट करण्यात आल्याने त्यांचे रिक्षा चालक - मालक होण्याचे स्वप्न जवळपास भंग पावले आहे. ही बाब या चौघींपैकी एकीने परिवहन अधिकाऱ्यांना सांगितली. कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे संधी गमवावी लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती तिने केली आहे. (प्रतिनिधी)