युवासेनेची शाखाप्रमुखांना प्रश्नावली
By admin | Published: January 4, 2017 04:40 AM2017-01-04T04:40:12+5:302017-01-04T04:40:12+5:30
गेल्या पाच वर्षांत नगरसेवकांनी कोणकोणती कामे केली, या वेळी उमेदवार कसा हवा आहे, प्रचार कसा करणार या व अशा प्रश्नांची प्रश्नावली घेऊन, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे
ठाणे : गेल्या पाच वर्षांत नगरसेवकांनी कोणकोणती कामे केली, या वेळी उमेदवार कसा हवा आहे, प्रचार कसा करणार या व अशा प्रश्नांची प्रश्नावली घेऊन, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे कार्यकर्ते सध्या जेथे-जेथे महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, तेथे जात आहेत किंवा जाणार आहेत. शिवसेनेत वर्षानुवर्षे काम केलेल्या शाखाप्रमुखांना युवासेनेच्या परीक्षेला सामोरे जाण्याचे वास्तव पचवणे मात्र, अंमळ कठीण जात आहे, असे समजते. आदित्य यांच्या टीममध्ये अमेय घोले, पवन जाधव, समाधान सरवणकर, वरुण सरदेसाई, पूर्वेश सरनाईक, तेजस मेहता आदींचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारी प्रमुख पदाची धुरा स्वीकारल्यानंतर, वरिष्ठ नेत्यांची फळीच कामकाज पाहात होती. त्या फळीला सोबत घेऊन उद्धव यांनी प्रारंभी कामकाज केले. कालांतराने वयपरत्वे काही नेते निवृत्त झाले व मग त्यांची जागा अनिल देसाई, आदेश बांदेकर, अनिल परब आदींनी घेतली. (प्रतिनिधी)
- महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असलेल्या शहरात उमेदवारांची निवड पक्षाला सोपी व्हावी, याकरिता युवासेनेने एक प्रश्नावली तयार केली आहे.
-विविध विभागांत आठ ते दहा कार्यकर्ते तेथील शाखाप्रमुखांकडून या प्रश्नावलीची उत्तरे घेतात. सध्या मुंबईत हा उपक्रम सुरू आहे.