रवींद्रन यांनी केले ‘लोकमत’चे कौतुक

By admin | Published: July 24, 2015 03:27 AM2015-07-24T03:27:36+5:302015-07-24T03:27:36+5:30

जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरण्यात येईल. त्यांच्या सुखसुविधांना प्राधान्य देत त्यांचे राहणीमान कसे उंचावेल, यावर लक्ष देण्यात येईल.

Rabindranath appreciated 'Lokmat' | रवींद्रन यांनी केले ‘लोकमत’चे कौतुक

रवींद्रन यांनी केले ‘लोकमत’चे कौतुक

Next

अनिकेत घमंडी , डोंबिवली
जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरण्यात येईल. त्यांच्या सुखसुविधांना प्राधान्य देत त्यांचे राहणीमान कसे उंचावेल, यावर लक्ष देण्यात येईल. कल्याण-डोंबिवली या शहरांना चांगला इतिहास आहे. येथील नागरिकांचा चांगला नावलौकिकही आहे. तो वाढीस लागावा, यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करण्यात येतील. नागरिकांनीही त्यांना भेडसावणाऱ्या तक्रारींबाबत महापालिकेतील ठिकठिकाणच्या अधिकाऱ्यांना सूचित करावे. शक्य असेल तितके तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल, असा विश्वास केडीएमसीचे नवे आयएएस आयुक्त ई. रवींद्रन यांनी व्यक्त केला.
गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांनी आयुक्तपदाचा चार्ज घेतला. मधुकर अर्दड यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह अन्य महत्त्वाच्या पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांची भेट-बैठक घेतली. तसेच प्रसिद्धिमाध्यमांशीही चर्चा केली. महापालिका कर्मचाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले की, संघटितपणे काम करणे महत्त्वाचे असते. येथील कर्मचारी तसे आहेतच, ती वृत्ती वाढीस लागावी, यावर भर देण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक विभागाचे योगदान महत्त्वाचे आहे.

Web Title: Rabindranath appreciated 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.