राबोडीत अल्मुती इमारतीचा स्लॅब कोसळून दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 06:34 PM2018-11-30T18:34:26+5:302018-11-30T18:36:38+5:30

राबोडी भागातील अल्मुता नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Rabodit Alamati building collapses slab and injures two | राबोडीत अल्मुती इमारतीचा स्लॅब कोसळून दोघे जखमी

राबोडीत अल्मुती इमारतीचा स्लॅब कोसळून दोघे जखमी

Next
ठळक मुद्देइमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचे आदेशदिड महिन्यातील दुसरी घटना

ठाणे - दीड महिन्यांपूर्वीच राबोडी - २ येथील शिवाजीनगरमध्ये ओम सूर्या नावाची तळ अधिक तीन मजली इमारत खचल्याचा प्रकार घडल्याची घटना घडली असताना शुक्र वारी राबोडी १ परिसरात देखील अल्मुता नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब आणि सिलिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून यापैकी एकाला माजिवडा येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ज्या रूममध्ये ही घटना घडली आहे त्या रूमधील कुटुंबाला बाहेर काढण्यात आले असून इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.
                   राबोडी १ परिसरातील जुम्मा मशीदच्या बाजूला अल्मुता ही १५ वर्ष जुनी इमारत आहे. शुक्र वारी सकाळी ११ च्या दरम्यान पहिल्या मजल्यावरील एका रूमधील स्लॅब आणि सिलिंग कोसळले. यामध्ये कुटुंबातील दोघेजण जखमी झाले आहेत . मोहहम्द हुसेन शेख (४६) असे एका जखमीचे नाव असून त्याला माजिवडा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या जखमीचे नाव समजू शकले नाही. या इमारतीमध्ये एकूण १६ कुटुंबे वास्तव्यास असून या घटनेनंतर आता इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. त्यानंतरच या इमारतीवर कारवाई करायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पालिका अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.
दीड महिन्यांपूर्वीच राबोडी २ परिसरात इमारत खचल्याचा प्रकार घडला होता. खचलेलेली इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर या इमारतीवर कारवाई करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानंतर आता राबोडी परिसरात ही दुसरी घटना घडली असून शहरात जुन्या असलेल्या इमारतींचा स्ट्रक्चरल आॅडिट करण्याकडे कल नसल्याने अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. पालिकेने सूचना देऊनही फार कमी टक्के रहिवाशांनी स्ट्रक्चरल आॅडिट केले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.


 

Web Title: Rabodit Alamati building collapses slab and injures two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.