मीरारोडच्या गृहसंकुलात रहिवाश्यां मध्ये राडा
By धीरज परब | Published: December 5, 2023 07:55 PM2023-12-05T19:55:04+5:302023-12-05T19:55:19+5:30
मीरारोड - मीरारोडच्या रामदेव पार्क भागातील एका गृहसंकुलात दुरुस्ती काम व स्ट्रक्चर ऑडिट वरून रहिवाश्यांचा आपसात तुंबळ राडा झाला. ...
मीरारोड - मीरारोडच्या रामदेव पार्क भागातील एका गृहसंकुलात दुरुस्ती काम व स्ट्रक्चर ऑडिट वरून रहिवाश्यांचा आपसात तुंबळ राडा झाला. नवघर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या फिर्यादी वरून गुन्हे दाखल केले असून चार जणांना अटक केली आहे.
रामदेव पार्क भागात आयडियल एन्क्लेव्ह जवळ महावीर नगर इमारत आहे . इमारतीच्या दुरुस्ती कामाच्या अनुषंगाने स्ट्रक्चर ऑडिट साठी शेखावत कंस्ट्रक्शनचे कर्मचारी ३ डिसेम्बरच्या रात्री इमारतीत आले होते . त्यावेळी प्रमोद सिंह, नितेश झा , युवराज सिंग , कमलेश झा व विनोद सिंग ह्या ५ रहिवाश्यांनी येऊन काम करण्यास रोखले . जो पर्यंत गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र खरात हे राजीनामा देत नाही तो पर्यंत काम होऊ देणार नाही असे धमकावले . खरात सह कृष्णकुमार पांडे व प्रशांत तिवारी हे मध्यस्थी करण्यास गेले असताना त्या ५ जणांनी शिवीगाळ करत मारहाण सुरु केली . त्यात कृष्णकुमार यांच्या डोक्यात धारदार वस्तूने मारले . कृष्णकुमार याना वाचवायला त्यांची आई व पत्नी मध्ये आले असताना त्यांना सुद्धा शिवीगाळ , मारहाण केली अशी फिर्याद कृष्णकुमार यांनी दिल्याने ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर विनोदकुमार सिंह यांनी दिलेल्या फिर्यादी वरून नवघर पोलिसांनी रवींद्र व त्यांची पत्नी मीनाक्षी खरात , कृष्णकुमार पांडे व पत्नी आणि बहीण पूजा , कोमल पांडे , श्याम पांडे , पप्पू पांडे , राहुल पांडे , रवी सैनी , अजय तिवारी , दक्ष व दीपक सोळंकी आणि राहुल त्रिपाठी ह्या १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सोसायटीच्या बिल्डिंग रिपेरिंग साठी स्ट्रक्चर ऑडिटचे काम मला कल्पना न देता सुरु करू नका असे विनोदकुमार यांनी सांगितल्याने त्यांना पट्ट्याने मारहाण केली . त्यांची पत्नी , दोन मुलं , भाऊ व पुतण्या मध्ये पडले असता त्यांना सुद्धा मारहाण केल्याचे नमूद आहे.
या प्रकरणी नवघर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या फिर्यादी वरून गुन्हे दाखल करून दोन्ही बाजू कडील प्रत्येकी २ जण प्रमाणे एकूण चौघांना अटक केली आहे . उपनिरीक्षक व्हास्कोटी हे तपास करत आहेत .