उल्हासनगरातील लालचक्की चौकात राडा; अनेक गाड्याची तोडफोड

By सदानंद नाईक | Published: August 19, 2023 05:25 PM2023-08-19T17:25:32+5:302023-08-19T17:25:44+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-४, लालचक्की चौकात इम्युनूएल विल्यम हे मित्रांसह उभे होते.

Rada at Lalchakki Chowk in Ulhasnagar Many cars vandalized | उल्हासनगरातील लालचक्की चौकात राडा; अनेक गाड्याची तोडफोड

उल्हासनगरातील लालचक्की चौकात राडा; अनेक गाड्याची तोडफोड

googlenewsNext

उल्हासनगर: शहरातील लालचक्की चौकात शुक्रवारी १२ वाजण्याच्या दरम्यान भाई बनता है क्या? यावरून राडा होऊन इम्युनूएल विल्यम यांच्या कारसह अन्य कार व दुचाकींचा तोडफोड केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात शुभम यादव व पक्या भाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-४, लालचक्की चौकात इम्युनूएल विल्यम हे मित्रांसह उभे होते. त्यावेळी पक्या भाऊ याचा फोन येऊन खुद्द को भाई समजता है क्या, मुझे मारनेकीं धमकी देत है क्या? असे बोलून थांब मैं आ राहा हुं. असे बोलून काही वेळात दोघे लालचक्की चौकात आले. त्यांनी विल्यम यांच्या कारची तोडफोड करून अन्य कार व दुकजकीची तोडफोड केली. तसेच विल्यम व त्याच्या मित्राला मारहाण केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात यादव व पक्या भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Rada at Lalchakki Chowk in Ulhasnagar Many cars vandalized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.