वनकर्मचारी चौकशीच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 10:52 PM2018-08-23T22:52:42+5:302018-08-23T22:53:14+5:30

शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा मोठा साठा काही दिवसांपूर्वी पकडला होता

On the radar inquiry radar | वनकर्मचारी चौकशीच्या रडारवर

वनकर्मचारी चौकशीच्या रडारवर

Next

वाडा : शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा मोठा साठा काही दिवसांपूर्वी पकडला होता. सुमारे ५० ते ६० ट्रक लाकडाचा साठा पकडला असून हा माल नेमकी कुठून आला हे वनविभाग अद्याप निश्चित करू शकलेले नाही. तालुक्यातील भुदान पाडा (तुसे) येथील मालकी तोडून सुमारे १२ ते १५ ट्रक लाकडाचा माल याच दास्तान डेपोवर टाकण्यात आला असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. विशेष म्हणजे तुसे येथे वन तपासणी नाका असताना हा माल येथून दास्तान डेपोवर गेला कसा असा सवाल आता उपस्थित होऊ लागला असून या प्रकरणात अनेक वनकर्मचारी संशयाच्या गर्तेत आहेत.
वाडा मनोर महामार्गावरील ठाणगेपाडा येथे एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा साठा असल्याची खबर वनविभागाला मिळताच त्यावर धाड टाकून या डेपोत विनापरवाना ५० ते ६० ट्रक साग, खैर व इंजाली असा १०१२ घनमीटर लाकडाचा माल जप्त करण्यात आला होता. जप्त केलेल्या लाकडांची किमंत ४० लाखांहून अधिक असल्याचे वनअधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यातील काही लाकडाचा माल आलमान गावातील काही शेतकºयांच्या खाजगी मालकीतील झाडे तोडून त्याचा साठा त्या दास्तान डेपोवर करण्यात आला होता, हे उघड झाले असले तरी आणखी माल कुठून आला हे वनविभाग अद्याप जाहीर करू शकलेले नाही.
मात्र, वनकर्मचारी व जंगल ठेकेदार यांच्यात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे की, यातील काही माल भुदान पाडा (तुसे) येथून तर काही माल विक्र मगड तालुक्यातील येथून आणल्याची चर्चा आहे.
भुदान पाडा (तुसे) येथील ३५ सेक्शन लागलेल्या खाजगी मालकीतून सुमारे १२ ते १५ ट्रक लाकडाचा माल या दास्तान डेपोवर आणला असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे तुसे येथे वनोपजाची तपासणी केंद्रे असल्याने तपासणी नाका ओलांडून लाकडाचा माल दास्तान डेपोवर आलाच कसा असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. हा माल आणताना ट्रकवर ताडपत्रीचे झाकण देऊन हा माल आणला गेल्याची चर्चा सुरू आहे. याशिवाय विक्र मगड तालुक्यातील झडपोली येथूनही लाकडाचा काही माल आणल्याची चर्चा आहे.
दरम्यान, लाकडाचा माल हा अनेक ठिकाणाहून आलेला असल्याने त्या त्या विभागातले वनकर्मचारी हे या प्रकरणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी असल्याने संशयाची सुई त्यांच्यापर्यत जाते. यात अनेक वनकर्मचारी गुंतले असल्याने या प्रकरणाची जिल्ह्याबाहेरील वनअधिकाºयाकडून चौकशी केल्यास सत्य उघडकीस येईल अन्यथा हे प्रकरण दाबून येथेच संपवण्याच्या प्रयत्नात वनअधिकारी असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या प्रकणाला छापा मारणारे अधिकारी व स्थानिक अधिकारी यांच्यातील मतभेदाची किनार असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळेच एवढे मोठे प्रकरण उघड झाले असून या भागातील असे अनेक दस्तानामध्ये तस्कीची लाकडे असण्याचा संशय आहे.

Web Title: On the radar inquiry radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.