चित्रकला स्पर्धेत राहुल, सुवर्णा, नंदिनी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:45+5:302021-06-03T04:28:45+5:30

ठाणे : व्यसनमुक्ती आणि पर्यावरण रक्षण विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेत ५ ते १० वर्षे वयोगटांत राहुल उतेकर (प्रथम क्रमांक), ...

Rahul, Suvarna, Nandini first in painting competition | चित्रकला स्पर्धेत राहुल, सुवर्णा, नंदिनी प्रथम

चित्रकला स्पर्धेत राहुल, सुवर्णा, नंदिनी प्रथम

Next

ठाणे : व्यसनमुक्ती आणि पर्यावरण रक्षण विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेत ५ ते १० वर्षे वयोगटांत राहुल उतेकर (प्रथम क्रमांक), माही खैरालिया (दुसरा क्रमांक), तर करण मारोठिया यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. ११ ते १५ वयोगटांतील सुवर्णा पांजा (प्रथम क्रमांक), खुशी गोयल (दुसरा क्रमांक), आर्य राऊत (तिसरा क्रमांक) आणि १६ वर्षांवरील गटात नंदिनी कुडिया (प्रथम क्रमांक), सोनम मारोठिया (दुसरा क्रमांक) आणि सुनीता मारोठिया यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

विजेत्यांसह सर्व स्पर्धकांचे जाहीर कौतुक करून त्यांना भविष्यात गुगलवर पाहून चित्रे काढण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीला चालना द्या. परिसरातील वास्तव चित्रात उतरवा. यासह अनेक मार्गदर्शक सूचना सुविधा बंगेरा यांनी करीत, भविष्यात प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याची हमी त्यांनी दिली. अध्यक्षीय समारोप करताना जगदीश खैरालिया यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाला विरोध करीत याबाबतीत महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी केली. त्यास सर्वांनी पाठिंबा दिला. संस्थेच्या वतीने व्यसनाधीनता विरोधात प्रबोधनाचे काम सतत ठेवले जाणार असल्याची हमी यावेळी दिली. संस्थेच्यावतीने दिले जाणारे प्रशस्तीपत्राचे वाचन ही यावेळी करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष ललित मारोठिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रस्तावना संस्थेचे सचिव संजय धिंगाण यांनी मांडली. सदरचा कार्यक्रम गुगलमीटवर ऑनलाईन पार पाडण्याची धुरा दिलीप चौहान यांनी सांभाळली, तर आभार प्रदर्शन बाबुलाल करोतिया यांनी केले.

---–--------

Web Title: Rahul, Suvarna, Nandini first in painting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.