उल्हासनगरात अनैतिक धंद्यावर धाड; ५ महिलांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:46 AM2021-09-12T04:46:09+5:302021-09-12T04:46:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कॅम्प नं-४ परिसरातील पूनम लॉजमध्ये पोलिसांनी धाड टाकून अनैतिक धंदा करणाऱ्या पाच महिलांची सुटका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : कॅम्प नं-४ परिसरातील पूनम लॉजमध्ये पोलिसांनी धाड टाकून अनैतिक धंदा करणाऱ्या पाच महिलांची सुटका केली. याप्रकरणी लॉजचालकाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ मौर्यानगरी आशेळेगाव मुख्य रस्त्यावरील रहिवासी क्षेत्रात पूनम लॉजिंग ॲण्ड बोर्डिंग आहे. या लॉजमध्ये महिलांकडून अनैतिक धंदा करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीनुसार सहाय्यक पोलीस आयुक्त डी. डी. टेळे व विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांच्या आदेशानुसार पोलिसांनी गुरुवारी पूनम लॉजवर धाड टाकली असता, ५ महिलांकडून अनैतिक धंदा करून घेतला जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांची सुटका करून लॉजचालक जीवन शेट्टी (४२) याला अटक करून गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
यानिमित्ताने शहरातील बहुतांश लॉजिग ॲँड बोर्डिंगवर अनैतिक धंदा चालत असल्याची चर्चा यामुळे होत आहे. अशा लॉंजिगवर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.