कल्याण येथील धाडीत ठाणे पोलिसांनी हस्तगत केला एक कोटींचा अंमली पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 12:20 AM2021-06-21T00:20:03+5:302021-06-21T00:25:43+5:30
कल्याण येथील आधारवाडी चौक ते बिर्ला कॉलेज रिंग रोड दरम्यान ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भाविक विजय ठक्कर याच्यासह तिघांना नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत एक हजार ४६६ लेजरजिक अॅसिड पेपर, सातशे रुपयांची रोकड, पॉकेट आणि एक मोबाईल असा सुमारे एक कोटी दोन लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ठाणे: कल्याण येथील आधारवाडी चौक ते बिर्ला कॉलेज रिंग रोड दरम्यान ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भाविक विजय ठक्कर याच्यासह तिघांना नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत एक हजार ४६६ लेजरजिक अॅसिड पेपर, सातशे रुपयांची रोकड, पॉकेट आणि एक मोबाईल असा सुमारे एक कोटी दोन लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी रविवारी दिली.
कल्याणच्या आधारवाडी चौक परिसरातून अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या पथकानं १५ जून रोजी सापळा रचून भाविक ठक्कर या संशयिताला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पथकाशी झटापटी करीत त्याने तिथून पळ काढला. तिथे त्याचे पॉकेट आणि मोबाईलसह २९ लेसरजिक अॅसिड पेपर असा दोन लाख ३३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमालही पोलिसांच्या हाती लागला. फरारी आरोपी भाविक याला अखेर १८ जून रोजी या पथकाने अटक केली. दरम्यान, भाविक याच्या चौकशीमध्ये आणखी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आतापर्यंत एक कोटी दोन लाख ६२ हजारांचे अंमली पदार्थांचे पेपर जप्त केले आहेत. तिन्ही आरोपींना कल्याण न्यायालयाने २२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.